आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टेट बँक भरतीसाठी शिवसेनेची कार्यशाळा, १७,००० पेक्षा जास्त पदांकरिता भरती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सार्वजनिक क्षेत्रात सर्वात मोठ्या असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियात या वर्षी विपणन वा ग्राहकसेवा, सहकारी, कृषी सहकारी या पदांकरिता १७,००० पेक्षा जास्त पदांकरिता भरतीप्रक्रिया राबवित आहे. या प्रक्रियेत सहभागी हाेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता शिवसेनेच्या वतीने एकदिवसीय कार्यशाळा अायाेजित करण्यात येणार अाहे. या कार्यशाळेसाठी नावनाेंदणी करणे गरजेचे असून, येत्या काही दिवसांत कार्यशाळेची तारीख स्थळ जाहीर करण्यात येणार असल्याचे महानगरप्रमुख अजय बाेरस्ते यांनी कळविले अाहे.
संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्रात विविध सामाजिक लोकोपयोगी कार्यक्रम राबवित आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून एसबीअाय भरतीच्या कार्यशाळेकडे बघितले जात अाहे. विविध शासकीय योजना तसेच जनतेचा बँकिंगकडील कल बघता या क्षेत्रात लाखोंच्या संख्येने रोजगार उपलब्ध होत आहेत. परंतु, महाराष्ट्रातील युवक - युवतींचे यशाचे प्रमाण हे अन्य प्रांतातील उमेदवारांच्या तुलनेत कमी असून, बँकिंग क्षेत्रात मराठी टक्का वाढावा तसेच शहरी वा ग्रामीण भागातील युवक - युवतींना लाभ घेता यावा, याकरिता शिवसेनेने या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

काय असेल कार्यशाळेत? : याकार्यशाळेत पूर्व परीक्षेतील घटक जसे इंग्रजी, गणितीय अभियोग्यता, तर्कशक्ती या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच परीक्षेतील प्रश्नांचे काठिण्य स्वरूप, अभ्यासपद्धती, कमी कालावधीत यश संपादन करण्याचे कौशल्य या सर्व बाबींवर प्रकाश टाकण्यात येईल.

नावनोंदणी अावश्यक
या कार्यशाळेला प्रख्यात करिअर मार्गदर्शक सागर धर्माधिकारी त्यांचे सहकारी मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळा विनामूल्य असून, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी केले आहे. कार्यशाळेत नोंदणीकरिता शालिमार येथील शिवसेना कार्यालयात २७ ते ३० एप्रिल या कालावधीत नोंदणी करायची आहे.