आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भविष्य निधी काढणाऱ्यांचे प्रमाण धक्कादायक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - उतरत्या वयातील सुरक्षितता म्हणून भविष्य निधीकडे पाहिले जाते. मात्र, या याेजनेच्या मूळ उद्देशाबद्दल जागरूकता नसल्याने वयाच्या एेन चाळिशीतच भविष्य निधीची संपूर्ण रक्कम काढून घेणाऱ्यांची संख्या एेंशी टक्के असल्याची धक्कादायक बाब समाेर अाली अाहे. नाशिक विभागात या संपूर्ण वर्षभरात ८७ हजार दावे निकाली काढण्यात अाले. त्यापैकी एेंशी टक्के दावे चाळिशीतील तरुणांचे, तिशीतील पन्नास टक्के कामगारांकडून अशाप्रकारे भविष्य निधी काढला जात अाहे.

भविष्य निधी कायद्यात नवीन संशाेधन करण्यात अाले असून, ते राजपत्रात प्रसिद्धही करण्यात अाले अाहे. यापैकी परिच्छेद ‘८६ एनएन’ यानुसार यापूर्वी ५४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर भविष्य निधीच्या ९० टक्के रक्कम काढता येत हाेती. याएेवजी नव्या तरतुदींनुसार ५७ वर्षे वयापर्यंत अशी रक्कम काढता येणार नाही. जर सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षे असेल तर ताे हा लाभ ५७ वर्षे वय झाल्यानंतर घेऊ शकेल. अाणि सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे असेल तर सदस्य हा लाभ ५९ वर्षे वय झाल्यानंतर घेऊ शकेल. यापुढे सदस्याला ५४ वर्षे वयात परिच्छेद ६८ एनएनचा लाभ घेता येणार नाही. ‘परिच्छेद ६८ एनएनएनएन’ ही तरतूद नुकतीच जाेडण्यात अाली असून, या अंतर्गत राेजगार समाप्तीवर भविष्य निधी जमा रक्कम शंभर टक्के काढता येणार नसल्याच्या उलटसुलट चर्चा सध्या सुरू अाहे. मात्र, त्या चुकीच्या असून, जवळपास ८० टक्के रक्कम काढता येणार असून, २० टक्केच्या अासपास रक्कम सदस्याच्या भविष्य निधीचा विचार करता काढता येणार नसल्याची तरतूद करण्यात अाली अाहे, जी सभासदांच्या हिताचीच अाहे. तरी याकरिता दाेन महिन्यांचा वेटिंग पिरीयड असेल. मात्र, दाेन महिने वेटिंग पिरीयडची ही अट त्या महिला सदस्यांना लागू नसेल ज्या विवाह करण्याच्या हेतूने, गराेदरपणा नाेकरीचा त्याग करतात त्यांना लागू नाही.

या कारणांसाठी भविष्य निधी रक्कम काढण्यात अालेले दावे
अाजारपण : २०१४-१५ मध्ये १६००
२०१५-१६ मध्ये २,०००
घरबांधणी : २०१४-१५ मध्ये ३६००
२०१५-१६ मध्ये ३६००
लग्नकार्य : २०१५-१६ मध्ये ११००
सन २०१६-१७ मध्ये ९०० (जाने. ते फेब्रुवारी)