आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Short Circuit Issue In Police Ayuktalaya At Nashik

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वायरलेस विभाग भस्मसात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पोलिस आयुक्तालयातील बिनतारी संदेश (वायरलेस) विभागास शनिवारी सकाळच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागून हा विभाग पूर्णत: खाक झाला. या आगीमुळे चार जिल्ह्यांची संदेश यंत्रणा ठप्प झाली असून, सुमारे 42 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ग्रामीण पोलिस मुख्यालयातून या यंत्रणेचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. यंत्रणा दुरुस्त होण्यास आठ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता पोलिस अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.

अचानक लागलेल्या आगीमुळे विभागातील कर्मचार्‍यांची पळापळ झाली. काही वेळात अग्निशमन दलाचे दोन बंब या ठिकाणी दाखल झाले व त्यांनी अध्र्या तासात ही आग आटोक्यात आणली. आग आणि पाण्यामुळे विभागातील सर्वच यंत्रणा बंद पडली. व्ही सॅट मेसेजिंग स्टेशनमधील वातानुकूलन यंत्रणा पेटल्याने ही आग लागल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले. या कक्षातील दूरध्वनी, संगणक, संदेश यंत्रणा व महत्त्वाच्या यंत्रणा खाक झाल्या.

अहवाल वरिष्ठांना पाठविणार
आयुक्तालयातील या वायरलेस विभागात लागलेल्या आगीची चौकशी करण्यात येणार असून, सरकारवाडा पोलिस पंचनामा करून आगीचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवतील. आग प्रकरणाची पोलिस कायद्याप्रमाणे चौकशी केली जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.

ग्रामीण विभागात यंत्रणा सुरू
नाशिक शहरासाठी या विभागातून काम सुरू असते. आगीमुळे शहराच्या संदेश यंत्रणेच्या अडचणी निर्माण होणार आहेत. तूर्त ग्रामीण विभागातून यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दुरुस्त होण्यास आठ दिवसांचा कालावधी लागेल. संदीप दिवाण, पोलिस उपआयुक्त

संदेश देवाणघेवाण ठप्प
नाशिक परिक्षेत्रातील नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, नंदुरबार या पाच जिल्ह्यांसाठी हा वायरलेस विभाग कार्यरत होता. आगीत यंत्रणा खाक झाल्याने पाच जिल्ह्यांचा संपर्क तुटला आहे. मुंबई आयजी, डीआयजी विभागातील संदेश परिक्षेत्रातील ठाण्यांत पाठवले जात होते.