आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रावण विशेष: नंदी नसलेले नाशिकचे एकमेव कपालेश्वर मंदिर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'पद्मपूर' म्हणजे कमळाचे आणि 'गुलशनाबाद' म्हणजे फुलांचे शहर म्हणून प्राचीन काळात नाशिक शहराची ओळख होती. सहयाद्री पर्वताच्या कुशीतील दक्षिण गंगा गोदावरी नदीच्या काठावर नाशिक हे शहर वसलेले आहे. चौदा वर्षाच्या वनवासात आलेले राम-लक्ष्मण नाशिकजवळील जंगलात थांबले होते. लक्ष्मणाने येथेच शूर्पनखा नावाच्या राक्षसणीचे नाक कापले होते. म्हणून त्यावरून या पौराणिक शहराला 'नासिक' हे नाव पडले आहे. नाशिक शहराला देऊळांचे शहरही म्हणतात. पंचवटीमध्ये गोदा काठावर एक उंच टेकडी आहे. या टेकटीवर कपालेश्वर मंदिर आहे. प्रत्यक्ष महादेव अर्थात शंकराने येथे वास केल्याचा उल्लेख आख्यायिंकामध्ये आढळतो. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे महादेवाच्या पिंडीसमोर नंदी नाही. नंदी नसलेले हे महादेवाचे एकमेव मंदिर असावे.

'कपालेश्वर मंदिरात नंदी का नाही' ही पुराणकथा वाचण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा....