आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्याच्या पलीकडील मराठी व्यवहारासाठी प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महामंडळाचे काम केवळ मराठी पुस्तके वा साहित्यावरच करणे असे मर्यादित नसून, साहित्याच्या पलीकडील मराठी संस्कृतीसाठी, व्यवहारासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे अाहे त्यादृष्टीनेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ पाऊल उचलत अाहे. त्याला साथ हवी ती महामंडळांच्या घटक संस्थांची, त्यासाठी गरज अाहे ती जिल्हा मराठी संमेलनांची असे मत महामंडळाचे अध्यक्ष डाॅ. श्रीपाद जाेशी यांनी ‘दिव्य मराठी’ कार्यालयाला दिलेल्या भेटीप्रसंगी व्यक्त केले. तसेच, त्यांनी साहित्य अाणि साहित्य संमेलने या विषयावर अापली मते मांडली ती अशी...
संमेलनात प्रकाशकांची समिती : संमेलनातील ग्रंथप्रदर्शनासंदर्भात प्रकाशक आणि महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बरेचदा वाद हाेतात. ते हाेऊ नये, यासाठी प्रयत्न हाेत अाहेत. किंबहुना हे वाद टाळण्यासाठी प्रकाशकांची एक समितीच तयार करण्यात अाली अाहे. साहित्य संमेलनांमध्ये काेट्यवधी रुपयांच्या पुस्तकांची विक्री हाेत असते. पण त्यापासून महामंडळाला काहीच फायदा हाेताना दिसत नाही. नेहमी फक्त समन्वयकाचीच भूमिका अालेली अाहे. म्हणूनच महामंडळाला वाटा मिळावा, या उद्देशाने मुंबईचे चंद्रशेखर गोखले, औरंगाबादचे आसाराम लोमटे आणि पुण्याचे रवींद्र बेडकिहाळ यांचा समावेश असलेली समिती तयार करण्यात अाली अाहे.

लघुसंदेशाला प्रतिसाद, लाखभर रुपये जमा : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यासाठी अार्थिक सहकार्य करण्याची सुरुवात मी लघुसंदेश पाठवून केली हाेती. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाल. अाता केवळ तीन महिन्यात एक लाख रुपये जमा झाले अाहेत. यात सहकार्य करताना अगदी एक रुपयाही दिला तरी चालताे. पण तरी स्वत: एक रुपयाही देणाऱ्या काही मराठी माणसांनाच हा प्रतिसाद अत्यल्प वाटून त्यांनी टिकाही केली. पण उपक्रम जाेरात सुरू अाहे. विद्यार्थी अाणि शिक्षक यांच्याकडून अनुक्रमे प्रत्येकी किमान एक दहा रुपये गाेळा करण्याच्या प्रयाेगालाही प्रतिसाद लाभताे अाहे. हा वसा मी अाता अध्यक्षस्थानावर असेपर्यंत घेतलेला अाहे.

{ मराठी व्यवहारासाठी प्रयत्न म्हणजे काय करणार?
{करण्यासारखे खूप काही अाहे. पण, त्यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जिल्हा मराठी संमेलने. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी या संस्थेने जिल्हा मराठी संमेलनांसाठी प्रस्ताव दिला अाहे. या प्रस्तावानुसार महामंडळाने फक्त त्यांच्या बराेबर काम करायचे अाहे. पण यासाठी इच्छाशक्ती हवी ती घटक संस्थांची अाणि त्यांच्या शाखांची. त्या-त्या जिल्ह्यात त्या घटक संस्था वा शाखांनी अशी संमेलने घेण्यासाठी पुढाकार घेतला तरच हे शक्य अाहे.

{पण मग हा समन्वय कसा साधणार
{ताेच खरा प्रश्न अाहे. कारण घटक संस्था गांधी स्मारक निधीला भेटणार नाही अाणि स्मारक निधी भेटण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणूनच त्यातील मध्यस्ताचे काम अाम्ही नक्कीच करु.

{अशा संमेलनांच्या खर्चाचे काय?
{प्रत्येक जिल्ह्यात या संस्था छाेटी-माेठी संमेलने घेतच असतात. तिथे ते खर्च करत असतात. अाता अशा संमेलनांसाठी, तर गांधी स्मारक निधी साेबत अाहे. गरज अाहे ती घटक संस्थांच्या इच्छाशक्तीची अाणि कार्यकर्त्यांची. अाणखी एक मुद्दा असा अाहे की, उद्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर त्यासाठी मिळणाऱ्या ३०० काेटी निधीतून १० टक्के म्हणजे ३० काेटी रक्कम संमेलनांवर खर्च करावी लागते. म्हणजे अाज ना उद्या निधी उपलब्ध हाेणारच अाहे. म्हणून ही संमेलने महत्त्वाची ठरतील.

{अनेक संमेलने हाेत अाहेत?
{साहित्यासाठी अाणि मराठी भाषेसाठी ही चांगली बाब अाहे. संमेलनांसाठी शासनातर्फे अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठीच नाही, तर इतरही काही संमेलनांसाठी निधी दिला जाताे. त्याचा उद्देश काय अाहे. फक्त साहित्य घुसळण व्हावी एवढाच नाही; तर साहित्य अाणि भाषेची उपांगं अाहेत, संस्कृती व्यापकतेसाठी, केवळ अभिजात कला नाही, तर लाेककला, लाेकनृत्य, कलाकुसर म्हणजेच मराठीवर व्यवहार करणारे अाणि मराठी भाषेपासून ज्यांची उपजीविका अाहे त्याच्याशी संस्कृतीचा संबंध येताे. अशा सगळ्या मराठी जनजीवनाशी संबंधित संमेलन हाेणं हा खरा उद्देश अाहे.

{राज्य शासनाकडूनही यासाठी काही करता येऊ शकतं...
{पण इच्छाशक्ती हवी. मी साहित्य-संस्कृती मंडळावरही काम केले अाहे. त्यावेळी अाम्ही महत्त्वाची सूचना केली हाेती की, साहित्य अाणि संस्कृती या दाेन्ही बाबी वेगळ्या अाहेत. त्यामुळे ते दाेन्ही विभाग वेगळे करण्याची गरज अाहेे. पण त्याकडे अद्यापही लक्ष दिलेलं नाही. बरं त्याला काेणताही वैधानिक दर्जाही नाही, निधी नाही मग त्याचा उपयाेग काय? पण तरीही महामंडळ म्हणून अाम्ही त्याचा नक्कीच पाठपुरावा करणार अाहाेत.

{यंदाचे संमेलन कुठे असेल...
{अातापर्यंत संमेलनासाठी कल्याण सार्वजनिक वाचनालय, डाेंबिवली अाग्री युथ फाेरम, महाराष्ट्र साहित्य परिषद, सातारा, शाहूपुरी शाखा, बेळगाव सार्वजनिक वाचनालय, महाराष्ट्र साहित्य परिषद, इंदापूर शाखा यासह विदर्भातून चंद्रपूर जिल्ह्यातील बाळापूर तळोधीमधील कल्याण शिक्षण संस्था, अमरावती जिल्ह्यातील सिद्धपूरमधील प्रभू प्रबोधन संस्था यांचे निमंत्रण अाले अाहे. १६ १७ सप्टेंबरपर्यंत स्थळांना भेटी देऊन अनुकूलता तपासणार अाहे. त्यानंतर लगेचच १८ सप्टेंबर राेजीच्या बैठकीत हा निर्णय घेतला जाणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...