आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाहीतर उद्याचा शेतकरी नक्षलवादी हाेईल, नियाेजित संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ग्रामीण व्यवस्थेचे मूलभूत प्रश्न अाजही अनुत्तरीतच असून, ते प्रचंड धाेक्याचे बनले अाहेत. नक्षलवादी संकल्पनेचा मी समर्थक नाही. पण, ग्रामीण व्यवस्था किंबहुना अर्थव्यवस्था अशीच राहिली तर अाज मरणारी माणसे उद्या मारायला उठतील. राेजगारच शिल्लक राहिलेला नाही. परिणामी, उद्या त्यांचा कैवार घेणारा काेणी असाे वा नसाे, पण ग्रामीण व्यवस्थेतील शेतकरी नक्षलवादाच्या वाटेवर जाण्याची वेळ येऊन ते संस्कृतीच्या भविष्याला नख लावणारे ठरू शकेल. मी नक्षलवादाचा पाठीराखा किंवा राज्यकर्त्यांच्या विराेधातही नाही, पण बारकाईने अाजच्या ग्राम्य जीवनाकडे बघितले तर हेच वास्तववादी चित्र दिसत असल्याचे ठाम मत नियाेजित संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड येथे जानेवारी महिन्यात हाेणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सबनीस यांनी साेमवारी (दि. १४) ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयाला दिलेल्या भेटीत साहित्य अाणि समाजजीवन यावर सविस्तर चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांच्या अाणि ग्रामीण प्रश्नांवरही परखड मते मांडली. सबनीस म्हणाले की, शेती अाणि शेती उर्वरित.

कलम ३२३ (ब)चा सगळ्यांनाच विसर
शेतकरीहा जीवनावश्यक वस्तूंचा उत्पादक अाहे, हे महत्त्वाचे असूनही अाजपर्यंत अगदी शरद जाेशींसह अाजच्या राजू शेट्टींपर्यंत काेणीच घटनेतील ३२३ (ब) या कलमानुसार लवाद निर्माण का केला नाही? जर असा लवाद निर्माण केला तर संघटनेला केंद्र सरकारकडे शेतमालाच्या अाधारभूत किमतीसाठी दाद मागता येईल, किंबहुना सरकारला त्यावर निर्णय देणं बंधनकारकच ठरलं असतं. जेणेकरून सद्यस्थितीनुसार वाढता उत्पादनखर्च अाणि मिळणारा भाव यातील तफावत दूर झाली असती, हेच अध्यक्षीय भाषणात मी मांडणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...