आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेटी बचावचाही संदेश, अातषबाजी टाळली, दर्शनासाठी हजाराे भाविकांची गर्दी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘सियावररामचंद्र की जय’, ‘राजाधिराज भगवान श्री रामचंद्र की जय’च्या गगनभेदी घाेषणांसह हजारो भाविकांनी ‘राम-सीता, राम-सीता’चा जयघाेष करीत श्रीराम आणि गरुड रथावर पुष्पवृष्टी करीत दर्शन घेतले. प्रभू रामचंद्रांचा धर्मध्वज डौलाने फडकवत निघालेल्या या रथोत्सवाच्या दिमाखदार सोहळ्यात यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा अपव्यय टाळतानाच पाणी बचाव, बेटी बचावचा संदेश देत अाणि दरवर्षी केली जाणारी फटाक्यांची अातषबाजी टाळत सामाजिक बांधिलकीचे अनाेखे दर्शन घडवण्यात अाले.
सालाबादप्रमाणे चैत्री नवरात्राेत्सवानंतर कामदा एकादशीच्या दिवशी श्रीराम आणि गरुड रथाची मिरवणूक काढण्यात येते. यावेळी अाबालवृद्धांसह महिला अाणि तरुणाईने दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केल्याने सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले हाेते. ढोल - ताशे, बॅण्ड पथकाचा गजर आणि सनईच्या मधुर स्वरांनी वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. सायंकाळी मंदिरातील भोगमूर्तींना पालखीद्वारे रथामध्ये आणण्यात आले. पूजाचे मानकरी आणि सालकऱ्यांच्या हस्ते विधिवत आरती करण्यात आली. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, आमदार बाळासाहेब सानप, अॅड. राहुल ढिकले, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, उपआयुक्त एन. अंबिका, वरिष्ठ निरीक्षक प्रकाश सपकाळे यांच्यासह काळाराम संस्थानचे अध्यक्ष एन. बी. बोस, मंडलेश्वर काळे, अॅड. दत्तप्रसाद निकम, वैभव पुजारी, धनंजय पुजारी, उमेश पुजारी, पांडुरंग बोडके, मंदार जानाेरकर, अॅड. अाेमप्रकाश लाेया, डाॅ. अतुल वडगावकर, डाॅ. एकनाथ कुलकर्णी अादी विश्वस्तांच्या हस्ते पूजा करण्यात आली. श्रीरामरथाचे रघुनंदन मुठे यांनी, तर गरुडरथाचे सूत्रसंचालन चंदन पूजाधिकारी यांनी केले. रथावर मोजक्याच पुजाऱ्यांना स्थान देण्याची सूचना पोलिसांकडून करण्यात आली होती. त्यामुळे यंदा दोन्ही रथांवर राजकीय पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली नव्हती. रथमार्गावर विविध ठिकाणच्या स्थानिक मंडळांकडून तसेच महिलांकडून औक्षण करण्यात येत होते.

अशी निघाली मिरवणूक
काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून रथयात्रेला प्रारंभ करण्यात अाला. रथातून श्रीरामाच्या पादुका तसेच श्रीराम, लक्ष्मण अाणि सीतामाईच्या मूर्तींची मिरवणूक काढण्यात अाली. त्यासाठी शनिवारपासूनच दरवाजापाशी अाणलेले रथ अाकर्षक फुलांच्या माळांसह राेषणाईने सजवण्यात अाले हाेते. सरदार रास्ते अाखाडा तालीम संघ अाणि श्रीराम रथाेत्सव समितीतर्फे रथयात्रा साेहळ्याचे संयाेजन करण्यात अाले हाेते. रथ अाेढण्याचा मान रास्ते तालमीच्या तरुणांकडे, तर रथाची धुरा पाथरवट समाजाच्या तरुणांनी माेठ्या उत्साहाने पार पाडले. श्रीरामरथाची मिरवणूक काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून सुरू हाेऊन ढिकलेनगर, नागचाैक, जुना अाडगाव नाका, गणेशवाडीमार्गे गाडगे महाराज पुलाखालून म्हसाेबा पटांगणात अाणण्यात अाली. तर, गरुडरथ हा राेकडाेबा मंदिर, दिल्ली दरवाजा, दहीपूल, सावरकर मार्ग (चांदवडकर लेन), धुमाळ पाॅइंट, मेनराेड, बाेहाेरपट्टी, सराफ बाजार, बालाजी मंदिर, कपूरथळा मार्गावरून म्हसाेबा पटांगणावर अाल्यावर दाेन्ही रथांची भेट घडवण्यात अाली. त्यानंतर रात्री दाेन्ही रथ रामकुंडाजवळ अाणून उत्सवमूर्तींना अवभृतस्नान घालण्यात अाले. ढोल पथक, नाशिक आणि पुणे येथील झांज पथक, बॅण्ड, गृहराज ढोल पथक, स्वरसम्राट शहनाई पथक यांच्यासह धर्मध्वज फडकवणारे स्वतंत्र पथक रथोत्सवामध्ये सहभागी झाले होते.
श्रीराम रथाेत्सवात पाणीबचतीचे भान
सालकऱ्यांच्या हस्ते विधिवत आरती करण्यात आली. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, आमदार बाळासाहेब सानप, अॅड. राहुल ढिकले, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, उपआयुक्त एन. अंबिका, वरिष्ठ निरीक्षक प्रकाश सपकाळे यांच्यासह काळाराम संस्थानचे अध्यक्ष एन. बी. बोस, मंडलेश्वर काळे, अॅड. दत्तप्रसाद निकम, वैभव पुजारी, धनंजय पुजारी, उमेश पुजारी, पांडुरंग बोडके, मंदार जानाेरकर, अॅड. अाेमप्रकाश लाेया, डाॅ. अतुल वडगावकर, डाॅ. एकनाथ कुलकर्णी अादी विश्वस्तांच्या हस्ते पूजा करण्यात आली. श्रीरामरथाचे रघुनंदन मुठे यांनी, तर गरुडरथाचे सूत्रसंचालन चंदन पुजाधिकारी यांनी केले. रथावर मोजक्याच पुजाऱ्यांना स्थान देण्याची सूचना पोलिसांकडून करण्यात आली होती. त्यामुळे यंदा दोन्ही रथांवर राजकीय पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली नव्हती. रथमार्गावर विविध ठिकाणच्या स्थानिक मंडळांकडून तसेच महिलांकडून औक्षण करण्यात येत होते.

अशी निघाली मिरवणूक
काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून रथयात्रेला प्रारंभ करण्यात अाला. रथातून श्रीरामाच्या पादुका तसेच श्रीराम, लक्ष्मण अाणि सीतामाईच्या मूर्तींची मिरवणूक काढण्यात अाली. त्यासाठी शनिवारपासूनच दरवाजापाशी अाणलेले रथ अाकर्षक फुलांच्या माळांसह राेषणाईने सजवण्यात अाले हाेते. सरदार रास्ते अाखाडा तालीम संघ अाणि श्रीराम रथाेत्सव समितीतर्फे रथयात्रा साेहळ्याचे संयाेजन करण्यात अाले हाेते. रथ अाेढण्याचा मान रास्ते तालमीच्या तरुणांकडे, तर रथाची धुरा पाथरवट समाजाच्या तरुणांनी माेठ्या उत्साहाने पार पाडले. श्रीरामरथाची मिरवणूक काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून सुरू हाेऊन ढिकलेनगर, नागचाैक, जुना अाडगाव नाका, गणेशवाडीमार्गे गाडगे महाराज पुलाखालून म्हसाेबा पटांगणात अाणण्यात अाली. तर, गरुडरथ हा राेकडाेबा मंदिर, दिल्ली दरवाजा, दहीपूल, सावरकर मार्ग (चांदवडकर लेन), धुमाळ पाॅइंट , मेनराेड , बाेहाेरपट्टी , सराफ बाजार, बालाजी मंदिर, कपूरथळा मार्गावरून म्हसाेबा पटांगणावर अाल्यावर दाेन्ही रथांची भेट घडवण्यात अाली. त्यानंतर रात्री दाेन्ही रथ रामकुंडाजवळ अाणून उत्सवमूर्तींना अवभृथस्नान घालण्यात अाले. ढोल पथक, नाशिक आणि पुणे येथील झांज पथक, बॅण्ड, गृहराज ढोल पथक, स्वरसम्राट शहनाई पथक यांच्यासह धर्मध्वज फडकवणारे स्वतंत्र पथक रथोत्सवामध्ये सहभागी झाले होते.

सामाजिक संदेशांचे झळकले फलक
मानकरीअसलेल्या पाथरवट समाजातर्फे दरवर्षी महिलांचे ध्वजपथक रामरथाेत्सवात सामील व्हायचे. मात्र, यंदाची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन या पथकाने ‘पाणी बचाव’ अाणि ‘बेटी बचाव’चे सामाजिक संदेश झळकावले. तर दरवर्षी अवभृथस्नानासाठी पाणी साेडण्यासाठी अडून बसणाऱ्या ब्रह्मवृंदानेदेखील यंदा सामंजस्याची भूमिका घेतली. रामकुंडानजीक ठेवलेल्या पात्रातच उत्सवमूर्तींना स्नान घालण्यात अाले. तसेच, दरवर्षी विश्वस्त मंडळाकडून फटाक्यांच्या अातषबाजीवर केला जाणारा ६० ते ७० हजार रुपयांचा खर्च टाळून यंदा साधेपणाने उत्सव साजरा करण्यावर भर हाेता.

असा होता बंदोबस्त : पोलिसनिरीक्षक, ११ उपनिरीक्षक, १३१ कर्मचारी, ३१ महिला कर्मचारी आणि दोन स्ट्रायकिंग फोर्स तुकड्या. यासह स्वयंसेवक मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले होते. यासह पंचवटी पोलिस ठाण्याचे ६५ कर्मचारी बंदोबस्तामध्ये सहभागी झाले होते.
ढाेल-ताशांच्या गजरात सनईच्या मधुर स्वरात रविवारी सायंकाळी धर्मध्वज डाैलाने फडकत निघालेला श्रीरामरथ अतिशय उत्साहाने अाेढताना भाविक.