आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shri Saptshrungi College Project First Price Nashik

श्री सप्तशृंगी कॉलेजच्या शोधप्रकल्पास प्रथम पुरस्कार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक: श्री सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉ. अपर्णा राऊत यांनी मार्गदर्शन केलेल्या ‘मलावष्टंभात गुदवर्तीचा उपयोग’ या शोधप्रकल्पास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे आयोजित ‘आविष्कार-2012’ मध्ये राज्यस्तरावर प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे.
महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी डॉ. ललित पाटील याने हा प्रकल्प सादर केला. तसेच, प्रा. डॉ. मंजूषा मोरे यांनी ‘हर्बल कॉस्मेटिक्स प्रीपरेशन, इटस् कर्मशिअल अँड अँग्रीकल्चरल व्ह्यू’ या विषयावर प्रकल्प सादर केला. त्यासाठी त्यांनी विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले. तर यासाठी प्रा. डॉ. शैलजा चौंडीकर, प्रा. परशुराम पवार, प्रा. राजेंद्र कुलकर्णी व डॉ. मुकेश हिरे यांचे सहकार्य लाभले. संस्थापक अध्यक्ष डॉ. बाळासाहेब आहेर, अध्यक्षा हिमगौरी आडके, प्राचार्य डॉ. मिलिंद निकुंभ यांच्यासह विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
लॉ कॉलेजमध्ये कार्यशाळा
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या विधी महाविद्यालयातर्फे वतीने सोमवारी सकाळी 10 वाजता रावसाहेब थोरात सभागृहात ‘रिसेंट ट्रेण्ड्स अँँड चॅलेंजेस बिफोर लीगल एज्युकेशन’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेस विशाखापट्टणम येथील ए. पी. विधी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. ए. लक्ष्मीनाथ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार राहतील. त्याचबरोबर, प्राचार्य डॉ. रशिद शेख व अँड. एस. आर. भोसले उपस्थित राहणार आहेत. कार्यशाळेचे आयोजन संस्थेचे सभापती अँड. नितीन ठाकरे, प्राचार्य डॉ. कामासाई एस. व्ही. एम., प्रा. सी. सी. खैरनार, प्रा. किरण कांबळे करणार आहेत.