आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शुक्र ग्रह करणार उद्या सूर्यासोबत ‘मॉर्निंग वॉक’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शुक्र ग्रह बुधवारी (दि. 6 जून) सूर्यासोबत ‘मॉर्निंग वॉक’ करणार आहे. भारतात सूर्योदयावेळी म्हणजे सकाळी 6 वाजेपासून 10.20 पर्यंत हे अधिक्रमण दिसणार असून, एका शतकात केवळ दोनदा घडणारी ही अनोखी खगोलशास्त्रीय घटना आहे.
खगोलशास्त्राचे अभ्यासक अनिल दंडगव्हाळ व सचिन मालेगावकर यांनी याविषयी सांगितले, की कोपर्निकस, केपलर, गॅलिलिओ आणि न्यूटन यांच्यासारख्या शास्त्रज्ञांना त्यांच्या जीवनात हे अधिक्रमण पाहायला मिळाले नाही. तो योग आला असून, या शतकातील अखेरचे अधिक्रमण अनुभवण्याचे भाग्य लाभल्याने ही संधी कोणत्याही नागरिकाने सोडू नये.
अधिक्रमण ही विशेष वैज्ञानिक घटना असल्याने केंद्र सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाच्या वतीने डॉ. एन. सी. राणा वेधशाळेतर्फे हौशी खगोल मंडळाची विशेष राष्टÑीय कार्यशाळा घेण्यात आली होती. त्या कार्यशाळेत अधिक्रमणाचा इतिहास, वैज्ञानिक आणि तांत्रिक गणित याबाबत प्रशिक्षणार्थींना ज्ञान देऊन या घटनेबाबत अवगत करण्यात आले. त्यानंतर हौशी खगोल पर्यावरण मंडळ आणि रानपाखरं दुर्गभ्रमंतीच्या वतीने गोल्फ क्लब मैदानावर शुक्र अधिक्रमणाची विविध प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. या वैज्ञानिक घटनेचा सर्व नागरिकांनी निर्धारित उपाययोजनांसह लाभ घ्यावा, असे आवाहन हौशी खगोल पर्यावरण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. अमृतकुवर मंडलिक आणि खगोल अभ्यासक डॉ. निवास पाटील यांनी केले आहे. हे अधिक्रमण पाहण्यासाठी संस्थेने नाममात्र दरात सौरचष्मेदेखील उपलब्ध केले आहेत. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी 9422248264 किंवा 9922212099 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तब्बल 105 वर्षांनंतर येणारा हा योग असल्याने नाशिककरांनी त्याचा आवर्जून लाभ घ्यावा.
अधिक्रमण पाहताना..
अधिक्रमण कुणीही थेटपणे साध्या डोळ्यांनी किंवा साध्या दुर्बिणीद्वारे पाहू नये. छोट्या आरशावर सूर्याचे प्रतिबिंब घेऊन त्याची प्रतिमा पांढºया रंगाच्या भिंतीवर किंवा कागदावर परावर्तित करून त्यातून होणारे शुक्राचे अधिक्रमण बघावे. फार तर सौर फिल्टर लावलेले चष्मे किंवा विशेष प्रकारचे फिल्टर लावलेल्या दुर्बिणीतून ते पाहावे.
नाशिकमध्ये यावेळी..
नाशिक शहरात 6 जूनला सकाळी 6 ते 7.30 या वेळेत शुक्राचे सूर्यावरील अधिक्रमण अधिक चांगल्या पद्धतीने पाहता येणार असल्याची माहिती खगोलशास्त्र अभ्यासकांनी दिली. शहरात भोंसला सैनिकी शाळेसह अनेक ठिकाणी अधिक्रमण पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.