आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sidhanth Starcast Visit To Tantranyanni Adharasrama

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नात्यांचे गणित मांडणारा ‘सिद्धांत’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- आयुष्याच्या गणिताचं सूत्र अधोरेखित करणारा, जगण्याचं भान देणारा आणि आयुष्यातील अनेक पेचप्रसंगाची उकल करू पाहणारा, असा हा ‘सिद्धांत’ हा चित्रपट २९ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, स्वाती चिटणीस, किशोर कदम, गणेश यादव, सारंग साठ्ये, नेहा महाजन, माधवी सोमण, चंद्रशेखर कुलकर्णी, प्रशांत तपस्वी, सुरज सातव, बाबा आफळे आणि कांचन जाधव यांच्या सिनेमात भूमिका आहेत. या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञांनी आधाराश्रमाला भेटही दिली.
संगीत दिग्दर्शक शैलेंद्र बर्वे आणि गीतकार सौमित्र (किशोर कदम) यांच्या जोडगोळीने सजलेल्या गाण्यांना स्वरबद्ध केले ते गायक शंकर महादेवन आणि मकरंद देशपांडे यांनी. सिद्धांत या मराठी सिनेमाची निवड टोरांटो येथील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ साउथ अमेरिका (IFFSA) तसेच न्यूयॉर्क इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी करण्यात आली आहे. हा सिनेमा आजोबा अप्पा ठोसर म्हणजेच विक्रम गोखले आणि त्यांचा नातू वक्रतुंड ठोसर म्हणजेच अर्चित देवधर यांच्या आयुष्याभोवती फिरतो. त्यांच्यामधल्या नात्याचा एक अतूट धागा म्हणजे हा चित्रपट. हा धागा आहे प्रेमाचा, विश्वासाचा, नात्याचा आणि तत्त्वांचा. आजपर्यंत कार्यकारी निर्मात्याच्या भूमिकेत असणारे विवेक वाघ यानिमित्ताने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करीत आहेत. आतापर्यंत ‘चेकमेट', ‘रिंगा रिंगा', ‘शाळा', ‘फँड्री', ‘अजिंक्य' अशा एकापेक्षा एक सरस सिनेमांच्या आरेखनात अन् कार्यकारी निर्मात्याच्या भूमिकेत ते होते.