आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदिरानगर बाेगदा जनमतानुसार सुरू करण्याचे संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - इंदिरानगर येथील बाेगद्याप्रश्नी लाेकभावना लक्षात घेऊन त्या अनुषंगाने निर्णय घेतला जाईल. त्यासाठी पाेलिस अायुक्त अाणि संबंधित अधिकारी संस्थांशी चर्चा करावी लागेल, अशी माहिती वाहतूक विभागाचे पाेलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी देऊन बाेगदा पूर्ववत सुरू करण्याचे संकेत दिले अाहेत. ‘दिव्य मराठी’तर्फे अायाेजित ‘राउंड टेबल’मध्ये सोमवारी ते बाेलत हाेते. या वेळी उपस्थितांनी एकमुखाने बाेगदा सुरू करण्याची अाग्रही मागणी केली. इंदिरानगरचा बाेगदा तातडीने एकेरी वाहतुकीसाठी खुला करावा, अशी सूचनाही यावेळी अामदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केली. वाहतूक विभागाने बाेगदा बंद करून नागरिकांची माेठ्या प्रमाणात गैरसाेय केली अाहे. त्यामुळे केवळ इंदिरानगर परिसरातील नागरिकच नव्हे, तर संपूर्ण शहराला वेठीस धरले जात अाहे. या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने ‘राउंड टेबल’ काॅन्फरन्स घेऊन प्रशासन, लाेकप्रतिनिधी, कायदेतज्ज्ञ नागरिक यांच्यात साधकबाधक चर्चा घडवून अाणली. त्यातील मते अशी...
बोगदा बंदमुळे जंक्शनवर कोंडी होतेय. अडीच किलोमीटरचा फेरा नागरिकांना पडत आहे.
गरवारे पॉइंट हॉटेल सेवन हेवननजीक वाहने चढ-उतार मार्ग सुरू करावा.
मुंबई नाका ते लेखानगर दुहेरी वाहतूक सुरू ठेवावी. तशी अधिकृत अधिसूचना पोलिसांनी जारी करावी.

मुंबईहून नाशिककडे येताना बोगद्याजवळ खाली उतरणारी वाहतूक बंद करण्यात यावी.
आंबेडकरनगर, डीजीपीनगरमार्गे इंदिरानगर ते गोविंदनगर हा एकेरी मार्ग वाहतुकीस खुला करावा.

स्थानिक रहिवासी, वाहनचालकांची मते विचारात घेऊन निर्णय घेण्याची गरज.
या मुद्यांवर मांडली विविध घटकांनी आपली भूमिका

बोगद्यातून एकेरी वाहतूक हाच पर्याय
बोगदाबंद केल्याने सर्वाधिक त्रास इंदिरानगर परिसरातील रहिवाशांना झाला. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, गृहिणी आणि इतर नागरिकांना रोज किमान दोन ते तीन वेळा ये-जा करावी लागते. मोठे अंतर असल्याने कोंडीतून मार्ग काढताना वेळ वाया जातो. बोगद्याबाबत स्थानिकांच्या भावनांचा विचार करण्यात यावा. इंदिरानगरकडून येणारी वाहतूक बोगद्यातून एकेरी केल्यास स्थानिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल. स्थानिकांना विश्वासात घेतल्याने पोलिसांची भूमिका नेमकी काय आहे ते समजत नाही. -दीपालीकुलकर्णी, नगरसेविका

पाेलिस अायुक्तांसोबत करणार चर्चा
इंदिरानगरबोगदा बंद करणे हा कायमस्वरूपी पर्याय नाही. नागरिकांसह वाहनचालकांच्या हरकती मागविण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या भावनांशी मीदेखील सहमत अाहे. उड्डाणपूल जागोजागी उतरवण्यात आल्याने अडचणीचे झाले आहे. स्थानिक रहिवाशांच्या भावनांचा विचार करून पोलिस आयुक्त, रस्ते प्राधिकरण विभागाचे अभियंते आणि इतर िवभागांशी चर्चा करून बोगद्यावर पर्याय काढला जाईल. बोगद्यातून एकेरी वाहतूक सुरू करण्यासाठी पंधरा दिवसांत निर्णय घेण्यात येईल. -पंकज डहाणे, पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग

आधी बाेगदा माेकळा करा, नंतर पर्याय शाेधा
इंदिरानगरबाेगद्यातून नियमित वाहतूक सुरू हाेती. परंतु, अचानकपणे बाेगदा बंद करण्यात अाल्याने नागरिकांची गैरसाेय हाेत अाहे. माेठा फेरा मारावा लागत असल्यामुळे वेळ अाणि पैसेही अधिक खर्च हाेत अाहेत. पाेलिसांनी लाेकभावनेचा विचार करून तातडीने बाेगदा माेकळा करून द्यावा. त्यानंतर कायमस्वरूपी पर्यायांचा विचार करावा. यापुढील काळात लाेकांशी संबंधित निर्णय घेताना प्रशासनाने लाेकप्रतिनिधी अाणि नागरिकांची एकत्रित बैठक घ्यावी. काेणताही निर्णय तडकाफडकी घेऊन अडचणी वाढवू नयेत. -सीमाहिरे, अामदार

नागरिकांना विश्वासात घ्यावे
बाेगदा बंद करताना नागरिकांचे मतच जाणून घेतले गेले नाही. प्रशासनाने निर्णय घेतला अाणि तातडीने त्याची अंमलबजावणी केली. नागरिकांना विश्वासात घेण्याची गरज होती. प्रशासनाने भूमिका बदलवून बाेगदा सुरू करावा. सतीशसाेनवणे, नगरसेवक

विषय आणखी लांबवूू नये
इंदिरानगरबाेगदा सुरू करण्याची अामची सुरुवातीपासूनच अाग्रही मागणी अाहे. जनभावनेचा अादर करून प्रशासनानेही हा विषय फारसा लांबवू नये. बाेगदा सुरू झाल्यानंतर अन्य पर्यायांचा विचार करता येईल. राजेंद्रमहाले, नगरसेवक

सामाजिक शांततेचा भंग
प्रशासनानेइंदिरानगर येथील बंद केलेला बाेगदा त्वरित सुरू करून हा विषय तत्काळ मार्गी लागण्यासारखा अाहे. मात्र, त्यावर वेळकाढूपणा करून प्रशासन सामाजिक शांतता भंग करीत अाहे. त्यामुळे नागरिकांच्या गैरसोयीत आणखी भर पडत असून, नागरिकांचा संयम सुटल्यास त्याला प्रशासनच जबाबदार ठरेल. निशांतजाधव, पदाधिकारी, अाकांक्षा सामाजिक संस्था

तूर्तास बाेगदा खुला करावा
बाेगदाबंद अाहे, त्यामुळे अडचणी वाढलेल्या अाहेत. यासंदर्भात कायमस्वरूपी उपाययाेजना कराव्या लागतील. परंतु, कायमस्वरूपी ताेडगा निघेेपर्यंत बाेगदा सुरू करणे गरजेचे अाहे. पाेलिस प्रशासनाने हा बाेगदा बंद करण्यापूर्वी नागरिकांच्या भावनाच लक्षात घेतल्या नव्हत्या. यापुढे तरी लाेकभावनेचा अादर करावा. अॅड.भानुदास शाैचे, विधिज्ञ

एकेरी मार्ग, सिग्नलची गरज
इंदिरानगर,नाशिकरोडकडून येणाऱ्या नागरिकांसाठी बोगदा एकेरी वाहतुकीसाठी सुरू करावा. एकेरी मार्ग सुरू ठेवण्यास नागरिकांचा विरोध नाही. येथे सिग्नल यंत्रणाही सुरू करावी. वाहतूक नियंत्रणासाठी पर्यायी मार्गाचा विचार व्हावा. यशवंतनिकुळे, नगरसेवक
गाेविंदनगरहूून इंदिरानगरकडे जाताना ‘यू टर्न’चा वापर व्हावा

गाेविंदनगरकडूनइंदिरानगरकडे जाताना ‘यू टर्न’चा वापर करावा. इंदिरानगरकडून येणारी वाहने गाेविंदनगरकडे जाण्यासाठी एकेरी मार्ग तातडीने सुरू करणे गरजेचे अाहे. अर्थात, हा पर्याय तात्पुरता अाहे. काही महिन्यांनंतर या रस्त्याच्या दाेन्ही बाजू दुतर्फा वाहतुकीसाठी उपलब्ध करून द्याव्यात. साईनाथनगर चाैफुलीवर सिग्नलचे पाेल्स कशासाठी उभारले, तेदेखील समजण्यासारखे अाहे. विवेेकजायखेडकर, अार्किटेक्ट

हा मुद्दा केवळ इंदिरानगरपुरताच मर्यादित नाही...
इंदिरानगरचाबाेगदा बंद करताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अाणि एल अॅण्ड टी यांच्याशी पाेलिस प्रशासनाने चर्चा केली का? हा मुद्दा केवळ इंदिरानगरपुरता मर्यादित नसून, नाशिकराेड, डीजीपीनगर अादी परिसरातून येणाऱ्या सर्वांसाठीच महत्त्वपूर्ण अाहे. वाहनचालकांना ज्या निर्णयामुळे त्रास हाेत असेल, ताे तातडीने बदलण्यात यावा. यासंदर्भात निर्णय घेताना स्थानिक रहिवाशांसह येथून नित्याने ये-जा करणाऱ्यांची मते जाणून घ्यावीत. प्रा.कुणाल वाघ, नगरसेवक

गाेविंदनगर रस्ता एकेरी करू नये
^इंदिरानगरचाबाेगदा तातडीने सुरू करावा. मुंबई नाक्यापासून गाेविंदनगरकडे जाणारा रस्ता हा दुतर्फा सुरू ठेवावा. ताे एकेरी करण्याचा प्रयत्न करू नये. वाहतूक काेंडी साेडविण्यासंदर्भात ज्येष्ठ नागरिकांच्या बैठकी घेतल्या जात अाहेत. त्यांच्या भावना प्रशासनापर्यंत पाेहोचविण्यात येतील. -अश्विनीबाेरस्ते, नगरसेविका

पाेलिसांचे हम करे साे कायदा
^इंदिरानगरपरिसरात सिग्नल बसवला तर पर्याय निघू शकेल. परंतु, ज्यांच्याकडे वाहने अाहेत त्यांनीच सर्व्हेत सहभागी व्हावे, असे पाेलिस प्रशासनाचे म्हणणे अाहे. नागरिक अापल्यासाेबत प्रत्येक वेळी अारसी बुक घेऊन फिरणार का? हम करे साे कायदा, अशी पाेलिसांची भूमिका याेग्य नाही. हा बाेगदा तातडीने सुरू करावा. विजयसाने, भाजप नेते

बालक महिलांना त्रास
^रस्ताबंद केल्यामुळे लहान मुले महिलांना जास्त त्रास सहन करावा लागताे. अनेक जणांना दिवसातून दाेन ते तीन वेळा ये-जा करावी लागते. त्यांना अनेकदा माेठा फेरा मारावा लागत असल्याने मानसिक शारीरिक त्रास सहन करावा लागताे अाहे. या त्रासातून मुक्तता कधी हाेणार? अॅड.विद्युल्लता तातेड

लाेकांच्या गैरसाेयीवरच भर
^प्रशासनकेवळ देखावा करत वेळकाढूपणा करून इंिदरानगर बाेगद्याचा विषय लांबवत अाहे. वास्तविक स्थानिक रहिवाशांसह अन्य नागरिकांची गैरसाेय हाेत असल्याचे लक्षात येताच प्रशासनाने निर्णय बदलणे गरजेचे हाेते. त्यासाठी पंधरा दिवसांची वाट पाहणे अपेक्षित नव्हते. -शैलेशसाळुंके, पदाधिकारी, भाजप युवा माेर्चा

सिग्नलसंदर्भात अाम्ही पाठपुरावा करू...
^इंदिरानगरपरिसरात सिग्नलसंदर्भात पाेलिसांनी प्रस्ताव पाठवावा. याबाबत महापालिका प्रशासनाकडे अाम्ही पाठपुरावा करू. तसा प्रस्ताव दिल्यास चार दिवसांत सिग्नल यंत्रणा उभी करू नागरिकांचा प्रश्न तातडीने साेडवू. बंद बोगद्याबाबत निर्णय घेताना नागरिकांच्या भावना जाणून घ्याव्यात. -नामदेवपाटील, पदाधिकारी, मनसे

..तर निर्णय घ्यायला उशीर का होतोय?
^इंदिरानगरयेथील बाेगद्याचा विषय अतिशय छाेटा असल्याचे पाेलिस प्रशासनाचे म्हणणे अाहे. त्यामुळे असे असेल तर या छाेट्याशा विषयावर निर्णय घ्यायला इतका वेळ का लावला जात अाहे? शहरातील रस्ते हे नागरिकांच्या साेयीसाठी अाहेत. त्यामुळे येथून कायम वावर असणाऱ्या नागरिकांचाच प्राधान्याने विचार व्हावा. -तुषार जाेशी

ताण कमी होत नसताना प्रशासनाचा अट्टहास का?
^आधीइंदिरानगर येथील बंद केलेला बाेगदा सुरू करावा त्यानंतर कायमस्वरूपी पर्यायावर चर्चा करावी. अाताच्या परिस्थितीत बाेगदा बंद करूनही वाहतुकीचा ताण कमी झालेला नाही. अपघातांचे प्रमाणही कमी झालेले नाही. वाहतुकीच्या ताणावर परिणाम होत नसताना प्रशासनाचा अट्टहास का? -जगनपाटील, मंडल अध्यक्ष, भाजप

सर्व्हेचा कल बाेगद्याकडेच
^इंदिरानगरयेथील बाेगदा बंद करताना परिसरातील नागरिकांना लाेकप्रतिनिधींना विचारात घेतले गेलेले नाही. हा बोगदा त्वरित सुरू करण्याची गरज आहे. सर्व्हेतही सर्वाधिक प्रतिक्रिया या बाेगदा सुरू हाेण्याच्या बाजूनेच अाहेत. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांचा अंत पाहता बाेगदा तातडीने सुरू करावा. सचिनकुलकर्णी, पदाधिकारी, मनसे

एकतर्फी भूमिका सोडावी
^इंदिरानगरबाेगदा व्यवस्थित सुरू असताना ताे बंद करण्याची गरजच नव्हती. अात सगळेच लाेक हा बाेगदा सुरू करण्यासाठी अाग्रही असताना प्रशासन एकतर्फी भूमिका का घेत अाहे? चर्चेत वेळ घालविण्यापेक्षा प्रशासनाने आपली एकतर्फी भूमिका सोडून बंद असलेला बाेगदा त्वरित सुरू करून नंतर चर्चा करावी. पद्माकरअाहिरे, पदाधिकारी, अाम अादमी पक्ष

एकेरी मार्ग एकमेव पर्याय
^इंदिरानगरबोगद्यातून पोलिसांनी एकेरी मार्ग सुरू करावा. इंदिरानगर, डीजीपीनगर, नाशिकरोडकडून येणाऱ्या नागरिकांची भावना लक्षात घेता बोगद्यातून एकेरी मार्ग आणि पादचारी मार्ग सुरू करावा. सिग्नल यंत्रणेच्या पर्यायाचाही विचार करावा लागेल. जितेंद्रभावे, समन्वयक, आम आदमी पक्ष

बाेगदा कायमस्वरूपी पर्याय
^बोगदाबंद केल्याने लेखानगर येथेही वाहनचालकांचा गोंधळ उडतो. डीजीपीनगर, नाशिकरोडच्या नागरिकांनाही हा अडचणीचा निर्णय आहे. एक बोगदा बंद केल्याने सहा जंक्शनवर कोंडीचा परिणाम झाला आहे. एकेरी मार्ग, सिग्नलऐवजी बोगदा हा कायमस्वरूपी उपाय आहे. नीलेशचव्हाण, अार्किटेक्ट

गैरसाेयींत झाली वाढ
^उड्डाणपुलाची निर्मितीच चुकीच्या पद्धतीने झाली अाहे. हा मार्ग अाता अधिकच त्रासदायक ठरताे अाहे. सिडकाे इंदिरानगर या ठिकाणच्या नागरिकांना सातत्याने येथून ये-जा करावी लागते. मात्र, बोगदा बंद केल्याने गैरसाेय झाली अाहे. अर्चनाजाधव, नगरसेविका

बोगदा एकेरी वाहतुकीस खुला करावा
लाेकभावनेचाविचार करता स्थानिक नागरिक, वाहनधारकांची गैरसाेय हाेऊ नये, यासाठी तातडीने इंदिरानगरचा बाेगदा एकेरी वाहतुकीसाठी खुला करावा. याबाबत पाेलिस अायुक्तांशी मी तातडीने चर्चा करेन. वाहतूक काेंडी साेडविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययाेजना करावी. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्य केंद्राकडे त्याचा पाठपुरावा करून वर्षभराच्या अात यावर ठाेस सर्वमान्य उपाय शाेधण्यासाठी प्रयत्न करेन. रस्त्याच्या दाेन्ही बाजूने छाेटेखानी उड्डाणपूल बांधण्याचाही चांगला पर्याय अाहे. -प्रा. देवयानी फरांदे, अामदार