आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अध्यात्माच्या ओढीने आकर्षित विदेशी साधू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अध्यात्माची अाेढ, त्यातील परंपरांची महती जाणून घेणारे अनेक विदेशी नागरिक अापसूकपणे कुंभमेळ्याच्या स्थानांकडे अाकर्षित हाेत असतात. देशातील अन्य स्थानांप्रमाणे त्र्यंबक - नाशिकच्या कुंभमेळ्यातही यंदा विदेशी नागरिक अाणि गत काही वर्षांपासून साधू झालेले विदेशी नागरिक दाखल हाेण्याची शक्यता अाहे. देशभरातील साधू, महंतांसह विदेशी साधूंनादेखील यंदाच्या कुंभमेळ्याची अाेढ खेचून अाणणार असल्याने त्यांचेही दर्शन नाशिक - त्र्यंबकवासीयांना यंदा हाेणार अाहे.

अमेरिकन पती-पत्नी करतात साधना
अमेरिकेतील मूळ निवासी असलेल्या केचुरिया अाणि माशा या पती-पत्नीच्या जाेडीनेदेखील तीन वर्षांपूर्वी भारतात येऊन संन्यास स्वीकारला अाहे. याेग अाणि ध्यानसाधनेतील अधिक माहिती ज्यांच्याकडून मिळेल, अशा साधूंकडे जाऊन पुढील प्रशिक्षण घेण्याचा त्यांचा प्रयास असताे. सध्या ते वाराणसीच्या जगद‌्गुरू रामानंदाचार्य अाचार्य पीठात महंत स्वामी श्यामानंद यांच्याकडे राहून ध्यानधारणेची साधना अात्मसात करीत अाहेत. तसेच ते केवळ फलाहार करीत असून, सूर्याेदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर ते अन्न ग्रहण करीत नाहीत. मात्र, त्या व्यतिरिक्त अन्य काेणतीही माहिती ते देत नाहीत.

जपानची यशस्वी मॉडेल बनली साध्वी
सध्या वाराणसीच्या पायलटबाबाच्या आश्रमात शेरॉन वॅलेस अध्यात्मामध्ये रंगून गेलेल्या अाहेत. एकेकाळी ती जपानची प्रसिद्ध मॉडेल होती. मूळ अमेरिकेची निवासी असलेल्या शेरॉनने सायकाॅलॉजी आणि कम्युनिकेशनमध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर शिक्षिका म्हणून काम केले. एक वर्ष शिक्षण क्षेत्रात काम केल्यानंतर मित्राच्या सल्ल्यानुसार मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी ती १९७५ साली जपानला गेली. १९७९ साली ती जपानची सर्वात महागडी मॉडेल झाली. प्रदीर्घ काळ माॅडेलिंग केल्यावर तिला नैराश्याने घेरले. त्यानंतर गत पाच वर्षांपासून ती पायलटबाबांच्या सान्निध्यात अाल्यानंतर झालेल्या अामूलाग्र बदलामुळे अाता तिचे अायुष्यच पालटून गेले अाहे. रॅम्पवर चालणारी ही बाला अध्यात्माच्या खडतर मार्गावर चालू लागली अाहे.