आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सिंहस्थ ब्रँडिंग’ला यूट्यूबवर हिट्स, संपूर्ण श्रीक्षेत्र नाशिक दर्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थाच्या ब्रँडिंगसाठी यूट्यूबवर आता विविध प्रकारच्या क्लिप्स टाकल्या जात असून, त्यातून सिंहस्थ कुंभमेळा, नाशिक आणि गाेदावरी आदी विषयावर जनजागृती करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या क्लिप्सला असंख्य हिट्सही मिळत आहेत.
कुंभमेळ्याचा लाैकिक जागतिक पातळीवर वाढवण्यासाठी काही तरुणांनी पुढाकार घेतला असून, हे तरुण वा संस्था स्वखर्चाने काही व्हिडिआे तयार करून ते यूट्यूबवर शेअर करताना दिसत आहेत. कुंभमेळ्याशी संबंधित असंख्य क्लिप्स यूट्यूबवर बघायला मिळतात. त्यात विविध ठिकाणच्या मेळ्यांचे महत्त्व, नागा साधूंची परंपरा, विविध आखाड्यांची परंपरा आदींविषयीची माहिती उपलब्ध हाेते. यात नाशिकही मागे नसून येथे हाेणाऱ्या कुंभमेळ्यासाठीही असंख्य व्हिडिआे तयार करून ते यूट्यूबवर टाकण्यात येत आहेत. त्याला चांगले हिटसही मिळत आहेत.

बॅडस्टेट आॅफ रामकुंड
हिंदूजनजागृती समिती प्रस्तुत आणि सनातन संस्था निर्मित ‘बॅड स्टेट आॅफ रामकुंड नाशिक’ हा शहरातील रामकुंडाची दुरवस्था सांगणारा व्हिडिआे यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे.
यूट्यूबवर शेअर केलेल्या या व्हिडिआेत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी सांगितलेल्या ‘स्वच्छ भारत अभियाना’चा उल्लेख करून गाेदावरी स्वच्छ कधी हाेणार, असा प्रश्न केला आहे. व्हिडिआेत रामकुंडाची अस्वच्छता अधाेरेखित केले असून, आता तरी पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

फेमस रामकुंड इन नाशिक
रामकुंडाचीमहती सांगणारा हा व्हिडिआे असून, यात रामकुंड आणि परिसराचे संपूर्ण व्हिडिआे चित्रण बघायला मिळते. नदीचे खळखळणारे पाणी आणि आजूबाजूच्या निसर्गरम्य परिसरावर या व्हिडिआे निर्मात्याने भर दिला आहे.

सिंहस्थ भरणाऱ्या नाशिक त्र्यंबकेश्वरची माहिती भारतात देशाबाहेरील भाविकांना हाेण्यासाठी अल्ट्राम्युझिकने तयार केलेली संपूर्ण ‘श्रीक्षेत्र नाशिक दर्शन’ हा व्हिडिआे यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. त्यात नाशिकचे धार्मिक महत्त्व विशद करतानाच त्र्यंबक आणि वणी गडाचीही माहिती आहे. या व्हिडिआेला तब्बल १८ हजार ५९५ हिट्स मिळाले असून, २१ हजार ५४१ लाेकांनी सबस्क्राइब केले आहे.

कुंभथाॅनची वाटचाल
मंत्रभूमीपासूनतंत्रभूमीकडे नाशिक नगरीचा प्रवास सुरू झाला आहे. धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याकडे तंत्रज्ञदेखील माेठी पर्वणी म्हणून बघत आहेत. आपत्कालीन व्यवस्थापन, गर्दीचे व्यवस्थापन आणि इतर बाबींसाठी कुंभथाॅनच्या प्रयत्नांची माहिती यूट्यूबवरील या क्लिप्समधून मिळते.
बातम्या आणखी आहेत...