आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंहस्थ कामांसाठी १५ दिवसांची डेडलाइन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थाची कामे अद्याप पूर्ण झाली नसल्याने आता जिल्हाधिका-यांनी कठोर भूमिका घेत सर्वच विभागांना १५ एप्रिलपर्यंत कामे पूर्ण करण्याची डेडलाइन दिली आहे. १५ एप्रिलपर्यंत कामे अपूर्ण ठेवणा-या विभागाच्या अधिका-यांवर कारवाईचे संकेतही दिले आहेत. त्यामुळे सिंहस्थाची कामे वेळेत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

वर्षभरापासून सिंहस्थाचे नियोजन सुरू आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीनंतरच ख-या अर्थाने प्रत्यक्ष कामांना सुरुवात झाली. परंतु, साधुग्राम त्यासाठी आवश्यक जागेच्या मुद्यावरून बराच कालावधी गेला. त्यानंतर शाहीमार्गाचाही मुद्दा गाजल्याने महत्त्वाची कामे रखडली. काही निविदा निधी मिळण्यासही सुरुवातीच्या काळात विलंब झाला. परिणामी कामे वेळेत पूर्ण हाेण्याबाबत शंका उपस्थित झाली. परंतु, विभागीय आयुक्तांनी वैयक्तिक लक्ष घातले. नव्या जिल्हाधिका-यांनीही कामांच्या दर्जाला प्राधान्य दिले. त्याचे सकारात्मक परिणाम दिसत असले, तरीही वेळेत कामे होण्याबाबत धास्ती असल्याने जिल्हाधिका-यांनी बुधवारी सर्व विभागांची बैठक घेता प्रत्येक विभागाला एक-एक तास स्वतंत्र वेळ देत त्यांचा आढावा घेतला.
उज्जैन येथे हाेणा-या कुंभमेळ्याच्या कामांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी एक पथक जाणार आहे.