आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूक मोर्चाद्वारे अंनिसने केला शासनाचा धिक्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन एक वर्ष उलटून गेल्यानंतरही त्यांच्या मारेकऱ्यांचा शोध लावण्यात अपयशी ठरलेल्या शासनाच्या विरोधात महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने मूक मोर्चा काढून धिक्कार केला.

हुतात्मा स्मारक येथून मोर्चाला सुरुवात झाली. त्यात अंनिससह सहभागी झालेल्या समविचारी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध केला. हल्लेखोरांनो हाय-हाय विवेकाचा आवाज संपणार नाय, मारेकरांना अटक झालीच पाहिजे यासह विविध संदेश लिहिलेल्या पोस्टर्सद्वारे शासनाचा मोर्चेकऱ्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आला.

सीबीएस सिग्नल, शिवाजीरोड, शालिमार, एम. जी. रोडवरून संत गाडगेबाबा पुतळा येथे सांगता झाली. मोर्चात समितीचे जलि्हाध्यक्ष डॉ. संजय वाघ, प्राचार्य डॉ. शांताराम रायते, महेंद्र दातरंगे, सीटूचे डॉ. डी. एल. कराड, श्रीधर देशपांडे, डॉ. टी. आर. गोराणे, रेखा जाधव, विजया गोराणे, नगरसेवक तानाजी जायभावे यांच्यासह समाजकार्य महावदि्यालयाचे वदि्यार्थी, डी. एड. महावदि्यालयाच्या वदि्यार्थिनी, आयटक, छात्रभारती आदी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान, अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते विठ्ठल तुकाराम जाधव यांनी जलि्हाधिकारी कार्यालयासमोर १० ते ५ या वेळेत एक दविसाचे लाक्षणिक उपोषण केले.
रिक्षा संघटनेतर्फे अभिवादन
पंचवटीमधील राष्ट्रीय मजदूर संघ प्रणित रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने लिंबू मिरची छोडो अभियानाद्वारे डॉ. दाभोलकरांना प्रथम स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.