आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'स्किल्ड नाशिक' वाटचाल भविष्यात नाशिकची अाेळख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिकमधील प्रशिक्षित बांधकाम कारागीर देशात आणि परदेशातही नावाजले जात असून, त्यांच्यामुळे नजीकच्या भविष्यात नाशिकची अाेळख 'स्किल्ड नाशिक' अशी हाेईल, असे प्रतिपादन बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या 'क्रेडाई'च्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी काैशल्य विकास विभागाचे प्रमुख जितेंद्र ठक्कर यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या 'स्किल्ड इंडिया' या महत्त्वाकांक्षी धोरणांतर्गत देशात विविध क्षेत्रांतील कारागिरांच्या काैशल्य विकासाचे प्रयत्न सुरू अाहेत. त्याचाच एक भाग म्हणून क्रेडाई नाशिकच्या पुढाकाराने बांधकाम क्षेत्रातील कारागिरांच्या काैशल्य विकासाचा कार्यक्रम राबविण्यात येत अाहे. त्या अंतर्गत क्रेडाई नाशिकचे कार्यकारिणी सदस्य स्किल डेव्हलपमेंट प्रकल्पाचे प्रमुख रवी महाजन यांच्या 'अामाेदिनी' या कालिका मंदिरासमाेरील, गुरूद्वाराराेडवरील प्रकल्पावर चाळीस कारागिरांना महिनाभर काैशल्य विकासाचे प्रशिक्षण मुंबईच्या रुस्तमजी अकादमीच्या वतीने देण्यात अाले. त्यानंतर घेतलेल्या परीक्षेतील यशस्वी कारागिरांना प्रमाणपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जितेंद्र ठक्कर मार्गदर्शन करत हाेते.

व्यासपीठावर क्रेडाईच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य अनंत राजेगावकर, राज्य कार्यकारिणीचे उपाध्यक्ष सुनील भायभंग, क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष सुनील काेतवाल, सचिव उमेश वानखेडे, रुस्तमजी अकादमीचे प्रशिक्षक लालजीभाई पाटील, रवी महाजन आदी मान्यवर उपस्थित हाेते.

कारागिरांचा काैशल्य विकास, त्यांचा राेजगार सुरक्षितता वाढणे, बांधकाम व्यावसायिकांना अधिक दर्जेदार, वेळेत नव्या तंत्राच्या सहाय्याने बांधकाम करता येणे अादी लाभ या उपक्रमामुळे हाेत अाहेत. यावेळी अनंत राजेगावकर सुनील भायभंग यांनीही मार्गदर्शन केले. या उपक्रमाद्वारे स्किल्ड नाशिक घडविण्यासाठी क्रेडाई कटिबद्ध असल्याचे सुनील काेतवाल यावेळी म्हणाले. उमेश वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले.

क्रेडाई नाशिकच्या पुढाकाराने बांधकाम क्षेत्रातील कारागिरांच्या काैशल्य विकास उपक्रमाच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जितेंद्र ठक्कर. समवेत रवी महाजन, सुनील काेतवाल, उमेश वानखेडे अादी.
बातम्या आणखी आहेत...