आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ विद्यार्थ्यांचा वर्ग भरला हुतात्मा स्मारकात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सिल्वर ओक शाळा व्यवस्थापनाने आठ वर्षांपासून प्रवेश शुल्क घेतले नाही; मात्र अचानक दोन वर्षाच्या शुल्काची मागणी करत या विद्यार्थ्याबरोबरच इतरही वर्गाच्या मिळून 12 विद्यार्थ्यांना शाळेतून काढले. या विद्यार्थ्यांची शाळा आता हुतात्मा स्मारक येथे सुरू असून, त्याकडे शिक्षण उपसंचालकही दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शिक्षणविरोधी बाजारीकरण मंचने करत या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी बुधवारी (दि. 1) सायंकाळी 6 वाजता विविध संघटनांची बैठक होणार आहे.
शिक्षण बाजारीकरणविरोधी मंचचे म्हणणे..
शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांना शाळेत सामावून घेत नाही. अशा स्थितीत शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक आणि पोलिस किंवा जिल्हा प्रशासन कुठलाही तोडगा काढत नसून या 12 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार कायद्याने या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे नियमबाह्य आहे. त्यांच्यावर हा अन्याय होत असून, त्यावर शासकीय स्तरावर कारवाई होणे अपेक्षित असतानाही त्याकडे सारेच डोळे मिटून पाहात असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्यच धोक्यात आल्याची भावना मंचच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
अधिकार्‍यांची हतबलता
जिल्हाधिकारीही हा विषय शिक्षण विभागाचाच असल्याचे सांगत मी काहीच करू शकत नसल्याची हतबलता व्यक्त करत असल्याचे मंचाच्या वतीने सांगण्यात आले.