आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नाशिक - वर्षभरावर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीचे काम अगदी संथगतीने सुरू असतानाच, गुरुवारी मुख्य सचिवांकडे झालेली यासंदर्भातील बैठकही निष्फळ ठरली. 250 कोटी रुपयांचा निधी बुधवारी मिळाल्यानंतर दुसर्याच दिवशीच्या या बैठकीत ठोस निर्णय झाला नाही. यामुळे सिंहस्थाच्या तयारीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
सिंहस्थ कामांसाठी निधी नसल्याने प्रत्येक विभागाने आपापल्या खात्याच्या निधीतून तरतूद करून कामे सुरू करण्याचे आदेश या आधी झालेल्या नाशिक व मुंबईतील बैठकांतून देण्यात आले होते. तेच आदेश गुरुवारच्या बैठकीत मुख्य सचिवांनी दिले. वर्षभरापासून हेच आदेश मुख्य सचिवांकडून दिले जात असताना या विभागांनी कामे सुरू केली नसल्याने अशा विभागांची चांगलीच खरडट्टी त्यांनी काढली. मात्र, सिंहस्थ कक्ष वा त्यासाठी स्वतंत्र अधिकारी-कर्मचार्यांच्या नेमणुकीबाबत कुठलाही निर्णय झाला नाही. नाशिक येथे पावसाळ्यापूर्वी झालेल्या बैठकीत सचिवांनी कागदोपत्री सर्व प्रक्रिया पावसाळ्यातच पूर्ण करण्याचे आणि तो संपताच प्रत्यक्षात वर्क ऑर्डर देऊन कामे सुरू करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाव्यतिरिक्त अन्य विभागांनी कामांना सुरुवात केलेली नाही. पाटबंधारे विभागास गोदाघाटाचे काम त्वरित सुरू करण्याचे आदेश पुन्हा एकदा देत संबंधित अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.