आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंहस्थ कुंभमेळा भोजन ठेक्यावरून मनपा-जिल्हा प्रशासनामध्ये जुंपली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थात पुरविलेल्या भोजनांच्या बिलांची बचत गटांनी महापालिकेची मंजुरी घेतली. मात्र दिलेल्या बिलांमध्येच खाडाखोड केल्याने बिले प्रत्यक्षात जादा दाखविण्यात आली आहेत. शिवाय जिल्हा प्रशासनाने छापलेले कुपन्स जमा करता बचत गटांनी स्वत: छापलेले कुपन्स जमा केले. त्यामुळे या बिलांमध्ये संशय आहे. शिवाय, नियमाप्रमाणे जमा केलेल्या कुपन्सची बिले प्रशासनाने यापूर्वीच अदा केल्याचा खुलासा करत जिल्हा प्रशासनाने या गोंधळाला महापालिकेलाच जबाबदार धरले आहे. दरम्यान, वाढीव बिले मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठवल्याने, हा प्रश्न अधिकच अवघड झाला आहे.
पर्वणी काळात पालिकेने सेक्टरनिहाय बचतगटांचे तात्पुरते स्टॉल्स उभारले होते. स्टॉलधारकांना जिल्हा प्रशासनाने सिंहस्थासाठी नियुक्त केलेले अधिकारी कर्मचाऱ्यांना खाद्य पदार्थ पुरवण्याचा ठेका देऊन दरही निश्चित केले होते. जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, तीन पर्वण्यांमध्ये एकूण दिवस, असे दिवसरात्र वेळा भोजन, एक वेळ नाश्ता दोन वेळा चहा देण्यात आला. म्हणजेच व्यक्तीमागे दिवसाला कुपन याप्रमाणे दिवसांचे ४५ कुपन लागले, असे धरल्यास ३७१ कर्मचाऱ्यांना १६ हजार ६९५ कुपन लागले. त्याचे पैसेही यापूर्वीच बचत गटांना दिले. पण वाढीव बिले शिल्लक असल्याने बचत गटांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली. त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे बोट दाखविले.

या बचत गटाच्या महिलांनी बुधवारी (दि. २२) जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. मात्र पालिका आणि जिल्हा परिषद यांनी मिळून जवळपास २८ हजार कुपन्स लागल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ११ हजार ३०५ कुपन्स जादा कसे लागले, याचाच तपास जिल्हा प्रशासन करणार आहे. खरे तर जिल्हा प्रशासनाने ९० हजार कुपन छापले. त्यात जवळपास २८ हजार प्रत्यक्षात लागल्याचे सांगण्यात आले. महापालिकेने १५ बचत गटांचे सर्व मिळून ११ हजार ८६२ कुपन्स दिले होते. जिल्हा प्रशासनाने या सर्व कुपन्सचे एकूण बिल लाख २२ हजार ९६५ अदा केले. जिल्हा परिषदेच्याही बचत गटांचे लाख ११ हजार अदा केले. तरी पालिका जिल्हा प्रशासनाकडे बोट दाखवत बदनामी करत आसल्याचा आरोप प्रशासनाने केला. महापालिकेने स्टॉलमागे तीन हजार रुपये भाड्यापोटी घेतल्याचे सांगत, त्यातून ही बिले का दिली नाहीत, असा सवालही करत पालिकेचे पितळ उघडे केले आहे.

मंजुरीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे
जिल्हा प्रशासनाने बचत गटांच्या मंजूर केलेल्या बिलांनतर आता पुन्हा काही अतिरिक्त बिले जिल्हा प्रशासनाकडे आली. यात ओम साई बचत गटाची भोजनाची ५८१, तर सुकेशिनी महिला बचत गटाची नाश्त्याची ११८ चहाची १९२, साधना बचत गटाची नाश्त्याची २१७ चहाची ३९५, धारा बचत गटाची भोजनाची ३७३ बिले आहेत. त्यांची पडताळणी करून, हा प्रस्ताव विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल. त्यांच्या मंजुरीनंतरच ही बिले अदा केली जातील, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...