आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Simhastha Kumbh Mela Cctv Camera Security In Nashik

शहरावर 184 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची राहणार नजर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - कुंभमेळ्यात शहरात लाखोंच्या संख्येने दाखल होणार्‍या भाविकांच्या गर्दीचे नियोजन, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षिततेसाठी गृहविभागाच्या आदेशानुसार बसविण्यात येणार्‍या सुमारे 600 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची ठिकाणे निश्चित करण्यासाठी पाहणी करण्यात आली. सहायक पोलिस आयुक्त व मुंबईच्या प्राईस वॉटर कुपर कंपनीच्या प्रतिनिधींनी दोन दिवस शहरात पाहणी करून सर्वेक्षण केले.

संपूर्ण शहरात 184 ठिकाणी फिक्स पॉइँट आणि 400 ठिकाणी कुंभमेळ्याच्या कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात कॅमेरे बसविण्यात येणार आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यांतर्गत जागांची पाहणी करण्यात आली. यासाठी पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त पंकज डहाणे, पोलिस ठाण्यांचे निरीक्षक व कुपर कंपनीचे संचालक सुभाष पाटील व कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत जागांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये बसस्थानके, धार्मिक व पर्यटनस्थळे, गर्दीचे चौक, भाजीबाजाराच्या ठिकाणांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या ठिकाणी पाहणी
सिडकोतील शिवाजी चौक, स्टेट बॅँक चौक, पवननगर, उत्तमनगर, सातपूर चौक, पंचवटीतील काळाराम मंदिराचा रस्ता, गंगाघाट, रामकुंड परिसर ते दसक पंचकपर्यंतच्या नदीपात्राच्या घाटावर, नाशिकरोड बिटको चौक, मुक्तिधाम परिसर, भद्रकालीतील प्रार्थनास्थळे, रविवार कारंजा येथे सर्वेक्षण करण्यात आले. पंकज डहाणे, सहायक पोलिस आयुक्त