आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकसाठी काेट्यवधी, त्र्यंबकबाबत उदासीनता, जादा विकास निधी देण्याची प्रशासनाकडे मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- तीन अाखाड्यांचे साधू-महंत येतात त्या नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी काेट्यवधींचा निधी खर्च केला जात असताना, दुसरीकडे तब्बल दहा अाखाड्यांचे साधू-महंतांची उपस्थिती असणाऱ्या त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी अाखडता हात घेतला जाताे, अशा शब्दांत अाखाड्यांच्या महंतांनी भाजप शासनाबाबत नाराजी व्यक्त केली. अधिकारीवर्ग हा जागांच्या अभावाकडे अंगुलीनिर्देश करीत असल्याचे सांगत पालकमंत्री गिरीश महाजन यांनाही सिंहस्थाबाबत काेणत्याही प्रकारचे गांभीर्य नसल्याचे अाखाड्याचे सचिव श्री महंत समुद्रगिरी महाराज महंतांनी नमूद केले.
१४ जुलै राेजी कुंभपर्वाचे ध्वजाराेहण हाेणार अाहे. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील कामांची पाहणी करून साधू-महंतांनी कामकाजावर नाराजी व्यक्त केली. अाखाडा परिषदेचे सचिव महंत शंकरानंद सरस्वती महाराजांनी सांगितले की, देशातील १३ अाखाड्यांपैकी नाशिकला तीन, तर त्र्यंबकेश्वरला दहा अाखाड्यांचे साधू-संत येतात. शासनाकडून या तीन अाखाड्यांसाठी काेट्यवधींचा निधी खर्च केला जाताे. त्या पटीत दहा अाखाड्यांसाठी काहीच खर्च हाेत नाही. २३०० काेटी रुपयांच्या अाराखड्यात साधूंचे फक्त नाव अाहे. या पैशांचा वापर खऱ्या अर्थाने जनतेसाठीच हाेताे. शासनाने सिंहस्थासाठी अनिल चाैधरी यांची नेमणूक केली अाहे. मात्र, या अधिकाऱ्याचे कुणीच एेकत नाही. त्यांचे स्वीय सचिवदेखील फाेन घेत नाहीत. पालकमंत्री गिरीश महाजन यांनाही सिंहस्थाबाबत काेणत्याही प्रकारचे गांभीर्य नसल्याचे शंकरानंद महाराज यांनी सांगितले. भाजप सरकारला यश पचवता येत नसून, त्यांच्यात अहंकार निर्माण झाल्याने त्यांना साधू-संतांचा विसर पडल्याचेही सरस्वती महाराजांनी सांगितले.

अर्थहीन पद्धतीने खर्च
मुख्यमंत्र्यांशीमी याबाबत तीन वर्षांपूर्वीच चर्चा केली हाेती. गाेदावरीचे प्रदूषण राेखण्यासाठी अातापर्यंत कराेडाे रुपये खर्च झाले असून, ते अर्थहीन पद्धतीने खर्च करण्यात अाले अाहे. श्रीमहंत हरिगिरी महाराज, अखिल भारतीय अाखाडा परिषदेचे महामंत्री

त्र्यंबकसाठी ३१४ काेटी
महाराष्ट्रजीवन प्राधिकरणाकडून त्र्यंबकेश्वरचा भविष्यातील ३० वर्षांचा पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यात अाला अाहे. बेजे धरणातून नऊ कि.मी.ची पाइपलाइन करण्यात अाली अाहे. यासाठी निलगिरी पर्वतावर दाेन जलकुंभदेखील उभारण्यात येत अाहेत. शिखर समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे ३४.६९ काेटी रुपये नगरपरिषदेचे असून, उर्वरित रक्कम शासनाची असा ३१४ काेटींचा निधी त्र्यंबकसाठी अाहे.