आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंहस्थ कुंभमेळा संकेतस्थळ अखेर सुरू, भाविकांसाठी सहज मार्गदर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेले नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचे संकेतस्थळ अखेर सुरू झाले असून, सर्वसामान्यांसाठी ते खुलेही झाले आहे. त्यामुळे सिंहस्थाची अधिकृत माहिती, त्याचे धार्मिक-शास्त्रीय महत्त्व, नाशिक जिल्ह्याची ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, भौगोलिक पर्यटन याबाबतच्या माहितीसाठी इतरत्र जाण्याची आवश्यकता नसून, ही सारीच माहिती एकाच क्लिकवर या संकेतस्थळाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंहस्थाच्या कामांच्या पाहणी दौऱ्यातच या संकेतस्थळाचे उद््घाटन झाले. संकेतस्थळाच्या होमपेजवर २००३-०४ च्या कुंभाचे रामकुंडावरील शाहीस्नान आणि ध्वजपर्वाचे सुंदर छायाचित्र झळकत अाहे. संकेतस्थळाच्या होमपेजच्या वरच्या बाजूला उजवीकडे सिंहस्थाचा लोगो दिला असून, डाव्या बाजूला मराठी इंग्रजी असा पर्याय िदलेला अाहे. या संकेतस्थळावर नाशिकसह त्र्यंबकचीही सर्वच माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातीलच नव्हे, तर जगभरातून सिंहस्थासाठी येणाऱ्या भाविकांना सारीच माहिती सहज मिळणार आहे. त्याचबरोबर अभ्यासकांनाही या संकेतस्थळाची मदत होईल. संकेतस्थळ विभागीय आयुक्त एकनाथ डवले आणि जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या मार्गदर्शनाखाली अपर जिल्हाधिकारी (कुंभमेळा ) रघुनाथ गावडे आणि सिंहस्थ मेळा अधिकारी महेश पाटील यांच्या तीन महिन्यांच्या अथक प्रयत्नाने कार्यरत झाले आहे.

कुंभमेळ्याचे काउंटडाऊन
महाअाॅनलाइनने तयार केलेल्या www. kumbhmela2015.maharastra.gov.in या संकेतस्थळावर कुंभमेळा किती दिवसांवर अाहे, तसाच ध्वजपर्व साेहळ्याचे अाॅनलाइन काउंटडाऊन देण्यात अाले.

संकेतस्थळावरील माहिती
तात्पुरतीनिवास व्यवस्थेची माहिती संपर्क क्रमांक, हरवलेल्या मुलांच्या शाेधासाठी केंद्र शासनाच्या ट्रक चाइल्ड सिस्टिमची लिंक, कुंभमेळ्याच्या माहितीचे स्वतंत्र एक आयकॉन, शाहीमार्ग महत्त्वाचे मार्ग नकाशासह, हरित कुंभ उपक्रम, प्रशासकीय माहिती, अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक, सिंहस्थासंदर्भातील शासन आदेश, संकेतस्थळाबाबत तसेच सिंहस्थाबाबतची तक्रार वा सूचना देण्याची व्यवस्था.