आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंहस्थात रेल्वेस्थानकावर भाविकांसाठी नवे प्रवेशद्वार, रेल्वेमालधक्का येथून गाड्यांची सोय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- सिंहस्थात देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांमुळे रेल्वे स्थानकावर ताण पडून अनूचित घटना घडू नये म्हणून रेल्वे प्रशासनाने भाविकांसाठी स्वतंत्र मार्गाचे नियोजन केले अाहे. सिंहस्थासाठी रेल्वे स्थानकावर अालेल्या भाविकांना पूर्वेकडील सिन्नरफाटा येथील नवीन प्रवेशद्वारातून बाहेर काढण्यात येणार अाहे. शाहीस्नानानंतर परतणाऱ्या भाविकांना रेल्वे मालधक्का येथून गाड्यांची व्यवस्था केली जाणार अाहे.
िसंहस्थासाठी रेल्वेस्थानकाच्या पूर्व िसन्नरफाटा बाजूकडे प्रवेशद्वाराची उभारणी केली जात अाहे. तसेच नियाेजित गाड्यांसह रेल्वेने अकरा विशेष गाड्या साेडण्याचा प्राथमिक निर्णय घेतला अाहे. या गाड्यासाठी नव्याने उभारण्यात येणारा चाैथा प्लॅटफाॅर्म उपलब्ध करून दिला जाणार अाहे. विशेष गाड्यांनी येणाऱ्या भाविकांना प्लॅटफाॅर्मच्या बाजूला असलेल्या सिन्नर फाट्याकडील प्रवेशव्दारातून बाहेर काढले जाणार अाहे. त्यामुळे स्थानकावर गर्दीची परिस्थिती टळणार अाहे. िसंहस्थातील विशेष गाड्या रेल्वे मालधक्का,अाेढा देवळाली कॅम्प येथून साेडण्याचे रेल्वेचे नियाेजन अाहे. यापैकी सर्वाधिक गाड्या रेल्वे मालधक्क्यावरून साेडल्या जाणार आहेत. त्यासाठी सुभाषराेड मार्गे नवीन रस्त्याचे काम सुरू अाहे. मालधक्क्यावर भाविकांची थांबण्याची व्यवस्था केली जाणार अाहे. स्थानकावरील एक ते तीन प्लॅटफाॅर्मवरून नियाेजित, तर नवीन हाेणाऱ्या चाैथ्या प्लॅटफाॅर्मवरून िसंहस्थातील विशेष गाड्या साेडण्याचे नियाेजन प्रशासनाने केले अाहे.
ध्वनिक्षेपकावरून सूचना
रेल्वेस्थानकावर येणाऱ्या नाशिकमधून परतणाऱ्या भाविकांच्या माहितीसाठी रेल्वे स्थानक, मालधक्का, सिन्नरफाटा तसेच दसक गाेदावरी घाट, पंचवटी रामकुंड येथे भाविकांच्या माहितीसाठी ध्वनिक्षेपकावरून सूचना देण्याचे नियाेजन केले जाणार अाहे.
दसकसाठी अाग्रह
शाहीस्नानासाठीयेणाऱ्या भाविकांना िसन्नरफाटा प्रवेशव्दारातून बाहेर पडण्याची सूचना दिल्यानंतर त्यांना पंचवटीत जाण्याएेवजी दसक येथील गाेदावरी घाटावर स्नान करण्याचा अाग्रह करण्याचा प्रशासनाचा िवचार अाहे. शाहीस्नानाच्या दिवशी अगाेदरचे दाेन दिवस वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्यात येणार असल्याने पंचवटी, रामकुंड येथील गर्दीची परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासन दसक घाटाच्या वापरासाठी अाग्रही अाहे.