आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंहस्थाच्या वाचलेल्या ६७ काेटींतून विकासकामे, पालिकेने शासनाकडे मागितली परवानगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थ कामांचा निधी मिळावा, यासाठी दीड वर्षापूर्वी महापालिकेला राज्य शासनाकडे माेठा तगादा लावावा लागत हाेता खरा, अाता मात्र प्राप्त निधीतून वाचलेल्या खर्चात शहरातील मूलभूत विकासकामे करण्यासाठी शासनाची मनधरणी करण्याची वेळ महापालिका प्रशासनावर अाली अाहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार सिंहस्थाच्या कामातून सुमारे ६७ काेटी ४२ लाख रुपये खर्चाची बचत झाली अाहे. हा खर्च शहरातील विकासकामांसाठी करण्यास मिळावा म्हणून पालिका प्रशासनाने शासनाकडे परवानगी मागितली अाहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विविध कामांसाठी १११९ काेटी रुपयांच्या कामांच्या अाराखड्याला राज्य शासनाने मंजुरी दिली हाेती. त्यातील ९१९ काेटी रुपयांचा खर्च हा विकासकामांवर हाेणार हाेता, तर २०० काेटी रुपये भूसंपादनावर खर्च हाेणार हाेते. या कामांसाठी शासनाकडून सुमारे ६८९ काेटींचे अनुदान अपेक्षित हाेते. त्यात एप्रिल राेजी महापालिकेला ७० काेटी ४७ लाखांचा हप्ता राज्य शासनाकडून प्राप्त झाला अाहे. अशा प्रकारे अाजवर शासनाकडून महापालिकेस ६२२ काेटी लाख इतके अनुदान प्राप्त झाले अाहे. यात वाचलेले ६७ काेटी ४२ लाख रुपये विकासकामांसाठी वापरण्यास मिळण्याची परवानगी अाता महापालिका प्रशासनाने राज्य शासनाकडे केली अाहे. महापालिकेवर अार्थिक संकट अाल्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामातील शिल्लक अनुदानाच्या रकमेचा उपयाेग शहरातील विविध मूलभूत विकासकामांसाठी हाेऊ शकताे, असा उद्देश परवानगी मागण्यामागे असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते.

१२२ काेटींची देयके अदा करणे बाकी
सिंहस्थकामांची अातापर्यंत ७३० काेटींची देयके अदा करण्यात अालेली अाहेत. तर १२२ काेटींची देयके देणे अद्याप बाकी अाहे. यात विशेषत: रस्त्यात येणाऱ्या झाडांमुळे रस्त्यांची कामे प्रलंबित अाहेत. परिणामत: संबंधित ठेकेदारांना देयके देण्यास अडचणी उद््भवत अाहेत. याशिवाय, काही जलकुंभांची कामेही बाकी अाहेत.

७२७ काेटींचा स्पील अाेव्हर
महापालिकेवर सद्यस्थितीत ७२७ काेटी इतके बंधनात्मक दायित्व (स्पील अाेव्हर ) अाहे. यात १९२ काेटींच्या रस्त्यांचा समावेश अाहे. सद्यस्थितीत १३४ काेटींची कामे सुरू असून, उर्वरित कामांसाठी २६० काेटींचे कर्ज महापालिकेने काढले अाहे. त्यात ९५ काेटींची उचल अाजवर घेतली अाहे. घरकुल याेजनेसाठी महापालिकेने ९० काेटींचे कर्ज घेतले अाहे. त्यात अाजवर काेटी उचललेले अाहेत.
बातम्या आणखी आहेत...