नाशिकरोड - राजस्थानसरकारच्या वतीने दरवर्षी पुष्कर येथे घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीयस्तरावरील अश्व स्पर्धेत नाशिकरोडचा सिंगम अजिंक्य ठरला आहे. देशभरातील अश्वांना धूळ चारीत पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या अश्वाने राष्ट्रीयस्तरावर विजयी पताका फडकवली आहे. स्पर्धा बछडे अदंत दोन दात नर, बछडे अदंत दोन दात मादी, सर्वाेत्कृष्ट मादी अश्व, सर्वोत्कृष्ट नर अश्व अशा चार गटांत पार पडली. यात राजस्थान, पंजाब, हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड आदी राज्यांतील ३५ अश्व सहभागी झाले होते. पंजाब, राजस्थान वगळून महाराष्ट्राचा सर्वाधिक देखणा, उंचपुरा सिंगम विशेष लक्षवेधी ठरला.
अशीअसते स्पर्धा : स्पर्धेतअश्वाची उंची, कान, पाय, राहणीमान, स्वच्छता, उभे राहण्याची पद्धत, आरोग्य, प्रेझेंटेशन, साैंदर्याची तुलना होते. त्यात सिंगम सरस ठरला.
नित्यक्रम: सिंगमचीफार्ममध्ये मोठी ठेप ठेवली जाते. चारा, मक्याचे दाणे, उकडलेले जव, कुरा केलेला मका, सोयाबीन तेल, गव्हाचा भुसा हे त्याला खाण्यास दिले जाते. सकाळ, सायंकाळ तज्ज्ञांकडून त्याचा नियमित व्यायाम करून घेतला जातो.
फेब्रुवारीतराष्ट्रीय स्पर्धा : पुष्करच्याधर्तीवर फेब्रुवारी महिन्यात तळेगाव, दाभाडी येथे अखिल भारतीय स्तरावरील अश्व स्पर्धेचे आयोजन करणार आहे. स्पर्धा नाशिकला भरवणार होतो, मात्र तांत्रिक कारणास्तव या स्पर्धा पुण्याला होणार असल्याचे जय पेखळे यांनी सांगितले.
पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी
महाराष्ट्रातीलसारंगखेड येथे दहा वर्षांपूर्वी झालेल्या स्पर्धेत सहभागी मादी अपयशी ठरली होती. तेव्हापासून राष्ट्रीयस्तरावर राजस्थानच्या पुष्कर येथील ‘अश्व’ स्पर्धा जिंकण्याची शपथ घेतली होती. स्पर्धेतील पुरस्काराची रक्कम नगण्य असते. मात्र, विजेत्याला मिळणारी प्रतिष्ठा खूप मोठी असल्याने तीन महिन्यांपासून तयारी केली होती. स्पर्धेत देशभरातील ‘एकास एक अश्वा’मध्ये महाराष्ट्रातील पहिला अश्व ‘सिंगम’ अजिंक्य ठरला. पहिल्याच प्रयत्नातील यशाने अत्यानंद झाला आहे. जयपेखळे, संचालक,नाशिक स्टड फार्म
असा आहे सिंगम
सिंगमअश्व हा कुमेत रंगाचा, देखणा, रुबाबदार आणि उंचपुरा आहे. पंचकल्याणी असलेला हा अश्व शुभ मानला जातो. त्याचे वय आज साडेपाच वर्षे आहे. तज्ज्ञांकडून त्याचा नियमित व्यायाम करून घेतला जातो.