आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गायन राग, समयाच्या पलीकडे जायला हवं, स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांनी उलगडले स्वरजीवन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- गाण्यात रागाला अाणि समयाला अन्यन्य साधारण महत्त्व अाहेच. पण तेव्हा काळ वेगळा हाेता. तेव्हा त्या समयाला ताे राग गायिला जात, लाेकांना अावडही हाेती. मात्र, अाता अापण समय बघून राग अाळवत बसलाे, तर काय हाेईल हे मी वेगळं सांगायला नकाे.
रागाचा अाणि समयाचा संबंध ठेवण्यापेक्षा कलाकार कसे अाणि काय गाताे हे बघून गायन झाल्यास काळाच्या अाेघात गेलेले अनेक राग परत येतील, अशी अाशा स्वरयाेगिनी डाॅ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रभाताईंना भारतरत्न पंडित भीमसेन जाेशी शास्त्रीय संगीत पुरस्कार २०१४ प्रदान करण्यात अाला. यानिमित्ताने ज्येेष्ठ मुलाखतकार मंगला खाडिलकर यांनी प्रभाताईंचे अंतरंग उलगडण्याचा प्रयत्न केला. प्रभाताईंनीही मनमाेकळा संवाद साधत संगीतातील बारिक-सारिक गाेष्टींवर प्रकाश टाकला.
तुम्हीसुंदर बंदिशी बांधल्या अाहेत
हाेखरंतर बाबूराव गेल्यानंतर मला बंिदशी बांधण्याशिवाय पर्यायच नव्हता. मग म्हटलं की, प्रयत्न तर करून बघूया. रचनाकार म्हणून मारू बिहाग हाेताच. मग पुढे बंदिश जमली अाणि अनेक बंदिशी करू लागले.
तुमच्या बंदिशीतही वेगळेपण अाहे
अर्थात,प्रत्येक कलाकाराची स्वत:ची शैली असते. त्यानुसार बंदिश असावी. नाहीतर बंदिशीचे साैंदर्यच जाते. बंदिशीत साैदर्यस्थळं दाखवावी लागतात. शब्द, वळण, उच्चारणाला महत्त्व अाहे. ते पाेहाेचत नसल्यास ती बंदिश कसली. रसिकांनी ती लिहून ठेवावी, असा शब्दांचा वापर असावा अाणि ताे जाणिवेतून व्हावा. दुसऱ्याची बंदिश घेणे, तिची माेडताेड करून स्वत:ची बनवणे मला मान्य नाही.

तुमच्या संगीत प्रवासातील विलंबित ख्यालातील अंतराही बंदिशीत अाहे...
हाे,संगीत ही अमूर्त कला अाहे. गायकाला ती साकार करावी लागते. त्यामुळेच त्याला साधनं लागतात, तीच ही साधन अाहेत. ठुमरी, दादरा, धृपदधमारात शब्दांना महत्त्व अाहेच की, ठुमरीत भाव महत्त्वाचे ठरतात. शब्दाविना काम करता येणारा ख्याल हा एकमेव प्रकार अाहे. कमीत कमी शब्दांचा वापर करून ख्याला घाट उभा करता येताे. विलंबित ख्यालाची चाल संथ असते. मुखडा घेऊनच साैंदर्य दाखवता येते. शब्द असाे की नसाे, पण शब्द अारूढ हाेतात. लयही वाहती असते अाणि तसेच अालापालाच काम जास्त असल्याने ते काम स्थायीत करू शकते. पूर्वी अंतरा चाेरण्याच्या भीतीने गुरू गात नसत.

जुनेग्रंथ अाजच्या संगीताला पूरक अाहेत का?
तेग्रंथ त्या काळासाठी लिहिलेले हाेते. त्या काळी माणूस निसर्गाच्या जवळ हाेता. म्हणून ते ग्रंथही पूरक हाेते. तसे अापल्यावरही संस्कार हाेते. अाता काळ बदलला अाहे. अापण त्यातून बाहेर पडावं. पण, मूळ विसरावं असं नाही. मूळ धरूनच अाधुनिक व्हायला हवं.