आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गायक सुरेश वाडकर प्रकरणी 30 सप्टेंबरपूर्वी निकाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गायक सुरेश वाडकर यांनी नाशिकमध्ये खरेदी केलेल्या जमिनीच्या व्यवहारात फसवणूक झाल्याच्या तक्रारीवर सुनावणी पूर्ण झाली आहे. महिनाभरात निकाल देणे आवश्यक असल्याने आता 30 सप्टेंबरपूर्वी निकाल दिला जाणार असल्याचे अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी सांगितले.

या प्रकरणाची सुनावणी जुलैमध्येच होण्याची शक्यता होती. मात्र, पुरावे सादर करण्यासाठी मुदतीची मागणी वाडकरांच्या वकिलांनी केल्याने या प्रकरणी 27 ऑगस्ट रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. त्यानुसार, मंगळवारी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. आता फक्त निकाल बाकी आहे. देवळाली येथील या भूखंडाचे एकाच वेळी अनेकांसोबत करारनामे करण्यात आले. वाडकरांनीही या मिळकतीचे साठेखत केले. मात्र, त्यातील गुंतागुंत पाहता मालकी हक्क मिळण्यास अडचण आली. अखेर त्यांनी नाशिक प्रांतांकडे तक्रार दाखल केली. प्रांतांकडे प्रकरणांची संख्या अधिक असल्याने तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी समकक्ष अधिकार्‍यांना ते विभागून दिले. त्यानुसार, हे प्रकरण पुनर्वसन उपजिल्हाधिकार्‍यांनी निकाली काढले होते. दरम्यान, त्यात कालावधी गेल्याने पुन्हा हे प्रकरण प्रांतांकडे आले. मात्र, आधीच ते निकाली काढले असल्याने प्रांतांनी ते फेटाळले. आता हे प्रकरण अपर जिल्हाधिकार्‍यांकडे न्यायप्रविष्ट आहे.