आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंहस्थ ग्रामोत्सव: ..अन्यथा शासनावर दबाव; महंत सुधीरदास पुजारींचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पंचवटीकरांच्या सिंहस्थ ग्रामोत्सव समितीचा समावेश कुंभमेळा शासन नियोजन समितीत करण्यासाठी शासनावर दबाव टाकावा लागेल, असे मत महंत सुधीरदास पुजारी यांनी व्यक्त केले. माजी नगरसेवक भगवान भोगे यांच्या अध्यक्षतेखाली पंचवटीत झालेल्या ग्रामोत्सव समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

व्यासपीठावर प्रा. हरीश आडके, नगरसेविका कविता कर्डक, ज्येष्ठ रंगकर्मी नेताजी भोईर यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. सिंहस्थाचे नियोजन सुरू असल्याचे शासनाकडून सांगण्यात येते. पण, त्याचा सर्वाधिक भार ज्या पंचवटीकरांवर पडतो त्यांना शासनाची नियोजन समिती विश्वासात घेत नाही.

या ग्रामोत्सव समितीचा शासनाच्या नियोजन समितीत समावेश व्हावा, यासाठी शासनावर दबाव टाकावा लागेल, असे ते म्हणाले. या वेळी पंचवटीमधील ज्येष्ठ नागरिकांनी विविध सूचना मांडल्या. माजी नगरसेवक दिलीप खेडकर, लक्ष्मण धोत्रे, डॉ. जगन्नाथ तांदळे, उत्तम उगले, कृष्णकांत नेरकर, हरिश्चंद्र विधाते, यांच्यासह परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

सभेत मांडल्या या सूचना
सिंहस्थात समितीला स्थान मिळावे, समितीची शासनस्तरावर नोंद करावी, समिती बैठकांना अधिकृत मान्यता मिळावी, शासनाच्या प्रत्येक नियोजन बैठकीत समिती सदस्यांना स्थान असावे, नियोजनाबद्दल समितीच्या निदर्शनास आणावे, निधी वाटपात समितीला विश्वासात घ्यावे, शाही मार्गात येणार्‍या रहिवाशांचा विचार करावा, चार-पाच सिंहस्थांचा अनुभव असणार्‍यांच्या अनुभवाचा उपयोग करावा, अशा प्रकारच्या विविध सूचना या बैठकीमध्ये मांडण्यात आल्या.