आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा अनुभवायला मिळणार सिंहस्थ, छायाचित्रांचे आजपासून प्रदर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- राज्यातीलदुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नाशिकच्या सहा छायाचित्रकारांचे ‘मूडस अाॅफ कुंभ’ हे छायाचित्र प्रदर्शन १९ २० अाॅक्टाेबर राेजी सकाळी ११ ते रात्री १० या वेळेत तिडके काॅलनीतील एस. एस. के. सॉलिटियर हाॅटेलमध्ये भरविण्यात येणार अाहे.
या प्रदर्शनातील छायाचित्रांच्या विक्रीतून मिळणारे सर्वच्या सर्व पैसे ‘नाम’ फाउंडेशनला देण्यात येणार अाहेत. नाशिककरांना या प्रदर्शनातून सिंहस्थ कुंभमेळ्याची सफर तर घडणार अाहेच, त्याशिवाय यातील निवडक छायाचित्रे विकत घेऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी खारीचा वाटादेखील उचलता येणार अाहे. प्रदर्शनात अनिल पाटील, महेश कट्यारे, राम पवार, सचिन पाटील, समीर बाेंदार्डे श्रीकांत नागरे या सहा छायाचित्रकारांनी टिपलेल्या कुंभमेळ्यातील वेगळ्या छायाचित्रांचा अाविष्कार पाहायला मिळणार अाहे. अधिक माहितीसाठी ९८२२१७९३३६ अथवा ९२२५१२५६७४ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे अावाहन करण्यात अाले अाहे.