आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

१५ लाख विद्यार्थी घेणार हरितकुंभाची शपथ; ऑक्टोबरला उपक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- आगामी सिंहस्थ कुंभमेळा अधिकाधिक पर्यावरणपूरक करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शालेय स्तरावरूनदेखील जनजागृती सुरू केली आहे. त्यानुसार ऑक्टोबर रोजी शहर जिल्ह्यातील पाच हजार ३३५ शाळांमधील तब्बल १५ लाख विद्यार्थी एकाच वेळी हरितकुंभाची शपथ घेणार आहेत.
नाशिक शहरात पुढील वर्षी होणा-या सिंहस्थ कुंभमेळ्यात गोदावरी नदीला प्रचंड महत्त्व आहे. किंबहुना त्यामुळेच येथे कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. मात्र, सद्यस्थितीत अनेकविध कारणांमुळे प्रदूषित झालेल्या गोदामाईत कुंभमेळा कसा पार पाडणार, असा सवाल सर्वच स्तरांतून उपस्थित होतो आहे. विशेष म्हणजे पर्यावरणप्रेमी संस्थांनीही प्रदूषणाच्या कारणावरुन गोदावरीतील प्रदूषण निर्मूलन होण्याच्या मागणीसाठी थेट न्यायालयातच धाव घेतली अाहे. न्यायालयाने प्रशासनाला कुंभापूर्वीच गोदावरी नदीच्या स्वच्छतेचे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्याची तयारी प्रशासकीय स्तरावर सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून या प्रदूषणमुक्तीच्या उपक्रमात जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला सहभागी करून घेतले जाणार असून, त्यांनाही शपथ दिली जाईल. याचा आरंभ शहरासह ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालयांतून होत आहे. त्यासाठी शिक्षण उपसंचालकांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूकही करण्यात आली आहे.
ऑक्टोबरला जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शपथ देण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यानंतर महाविद्यालये, विविध शासकीय विभाग, औद्योगिक संस्था आणि कारखान्यांमध्ये, तसेच जिल्ह्यातील इतर संस्थांमध्येही हरित कुंभाची शपथ देण्याचा उपक्रम राबविण्याचा प्रशासनाचा मानस असल्याचे मेळा अधिकारी महेश पाटील यांनी सांगितले. शिक्षकांनी सादर केलेल्या अशा कलाविष्कारानेही उपस्थित प्रमुख पाहुणेदेखील भारावले होते.