आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sinhastha Kumbha Mela,latest News In Divya Marathi

सिंहस्थाच्या तयारीसाठी सरसावले साधू-महंत, महापौरांबरोबर दिल्लीला जाण्याची दर्शवली तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- अलाहाबादउज्जैन येथे सिंहस्थ कुंभमेळा सुरू होण्यापूर्वीच काही महिने कुंभमेळ्याची तयारी पूर्ण झाली होती. मात्र, नाशिकमध्ये तशी स्थिती दिसत नसल्यामुळे कामे कधी पूर्ण होणार, असा सवाल महापौर अशोक मुर्तडक यांना साधू-महंतांनी करत मोदी सरकारकडून निधी मिळवण्यासाठी पालिकेच्या पदाधिकारी दिल्लीला येण्याचीही तयारी दर्शवली आहे.

‘रामायण’ निवासस्थानी महापौर मुर्तडक यांची महंत भक्तचरणदास, महंत राजारामदास महाराज, महंत अंबादास महाराज, महंत रामकिशोर शास्त्री, महंत रामराज महाराज, उद्योजक धनंजय बेळे यांनी भेट घेतली. या वेळी भक्तचरणदास महाराज यांनी मागील कुंभमेळ्याची आठवण करून देत अद्याप कामे झाली नसल्याची खंत व्यक्त केली. त्यावर महापौरांनी वारंवार राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. मध्यंतरी नगरविकास विभागाच्या सचिवांची भेट घेऊन आपण एलबीटीने पालिकेची खालावलेली आर्थिक स्थिती १०५२ कोटींपैकी राज्य शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळण्याची मागणी केल्याचे सांगितले. केंद्राकडून निधी प्राप्त करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यावर आखाडा परिषद तसेच अन्य साधू-महंतांशी चर्चा करून मोदींची भेट घेण्यासाठी जाऊ, असेही भक्तचरणदास महाराज यांनी स्पष्ट केले.
निधीचेपत्र केंद्राकडे गेलेच नाही : भक्तचरणदासमहाराज यांनी अतिरिक्त निधीबाबत केंद्राकडे पत्र पोहोचले नसल्याची आपल्याकडे माहिती असल्याचा गौप्‍यस्‍फोट केला. त्यावर महापौरांनी माहिती घेतल्याशिवाय त्यावर अधिक बोलणे उचित ठरणार नाही, असे स्पष्टीकरण दिले. महापौर अशोक‍ मुर्तडक यांची सोमवारी महंत भक्तचरणदास, महंत राजारामदास महाराज, महंत अंबादास महाराज, महंत रामकिशोर शास्त्री, महंत रामराज महाराज उद्योजक धनंजय बेळे यांनी भेट घेतली