आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sinnar Depot On Top In North Maharashtra, Earning Two Crores

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तर महाराष्ट्रामध्ये सिन्नर आगार अव्वल, दोन कोटींचा नफा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिन्नर - उत्पन्नासहितविविध निकषांत गुणवंत ठरलेल्या सिन्नर आगाराने उत्तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला. नियमित सेवेच्या दैनंदिन फे-यांसह करार वाहतुकीतून जादा प्रवास कमी इंधन खर्चात तब्बल दोन कोटी १६ लाख ४० हजार रुपयांचे उत्पन्न आगाराने कमावले. हा सन्मान आगाराने दुस-यांदा पटकावला आहे.

७० बसेसद्वारे नियमित सेवेव्यतिरिक्त करार, यात्रा, सहलीच्या प्रवासातून आगाराने हे यशोशिखर गाठले. डिसेंबर २०१४ अखेर महिनाभरात लाख ८० हजार किलोमीटरचा प्रवास आगाराने केला. १० लाख ५० हजार प्रवाशांची विनाअपघात सुरक्षित वाहतूक केली. यातून आगारास दोन कोटी १६ लाख ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. कर्मचा-यांच्या कामाचे तास, किमान इंधनाची लागत, बसचा अत्यल्प घसारा आदी निकषांवर पात्रता मिळवताना नाशिकसह अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या पाचही जिल्ह्यात आगाराने बाजी मारली. आगार व्यवस्थापक दिलीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानकप्रमुख सरिता काळे, सुरेश दराडे, सहायक कार्यशाळा अधीक्षक विष्णू तांबे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक विजय उगले, प्रमोद घोलप, राजेंद्र झगडे आदींसह चालक, वाहक कार्यशाळेच्या कर्मचा-यांनी यासाठी परिश्रम घेतले.

प्रवासी ठरवतील तेथे पर्यटन यात्रा, सहलीसाठी तत्काळ बस उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाला प्रतिसाद मिळत आहे. नारायणपूर येथील दत्तयात्रेसाठी २२ बसची सुविधा करण्यात आली होती. त्यातून एक लाख ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. शिर्डी, जाळीचा देव, अष्टविनायक दर्शनासाठी बसेस पाठवण्यात आल्या. अडीच लाख प्रवाशांनी याचा लाभ घेतला. डिसेंबर २०१३ च्या तुलनेत आगाराने दोन लाख जादा किलोमीटरचा प्रवास केला. यातून तीन लाख प्रवाशांची जास्त वाहतूक झाली. गतवर्षी साडेसहा लाख प्रवाशांची वाहतूक केली होती.

यामुळे आगार प्रथम
* विनाअपघात सुरक्षित सेवा
*कमी इंधनात जादा उत्पन्न
*बसचा घसारा कमी
*उपलब्ध मनुष्यबळात जादा काम
*करार वाहतुकीला प्रोत्साहन
*नोकरदार पासधारकांना सेवा

दुस-यांदा सन्मान
इंधनबचत कमी खर्चात जादा उत्पन्नावर आधारित वर्षभरापूर्वी आगाराने राज्यात दुसरा विभागात प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणात इंधन बचत करण्यात आली होती.