आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sinnar Khed Road Becoming Four Line : MP Samir Bhujbal

सिन्नर-खेड रस्ता होणार चौपदरी : खासदार समीर भुजबळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - केंद्र शासनाने सिन्नर-खेड महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी 1574 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवल्याची माहिती खासदार समीर भुजबळ यांनी दिली. नाशिक - पुणे महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा नेहमीच टीकेचा विषय बनला होता. चाकण औद्योगिक वसाहतीमुळे रस्त्यांवरील वाहतूक वाढली होती.

त्यातच पेठ-अवसरी, खेड घाटात अपघातामुळे वाहतूक ठप्प होत होती. रस्त्यांचे जाळे सक्षम करण्याची मागणी होत होती. त्यामुळे खासदार भुजबळ यांनी विशेष प्रकल्पाची मागणी लावून धरली होती. भुजबळांच्या प्रयत्नाला यश आले असून, केंद्रीय मूलभूत सुविधा समितीने या प्रकल्पाला मंजुरी दिली. नॅशनल हायवे अँथोरिटी ऑफ इंडियामार्फत हा प्रकल्प राबवला जाणार आहे. 137.94 किलोमीटरचा हा मार्ग असणार आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार असून, प्रत्यक्ष कामकाज जून 2013 मध्ये सुरू होणार आहे. यापूर्वी नाशिक - सिन्नर रस्त्याच्या चौपदरीकरणाबाबत ऑक्टोबर 2012 मध्ये मान्यता मिळाली होती. या प्रकल्पासाठी 561 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. चार टप्प्यांत मार्ग होणार असून, द्वारका ते नाशिकरोड, नाशिकरोड ते सिन्नर, सिन्नर ते खेड राजगुरुनगर आणि खेड ते नाशिक फाटा, पुणे याप्रमाणे काम होणार आहे.

नाशिक-पुणे प्रवास होणार सुखकर
नाशिक - पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय ठरली होती. सिन्नर-खेड प्रकल्पाला मान्यता मिळाल्यामुळे भविष्यात नाशिक-पुणे प्रवास सुखकर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. समीर भुजबळ, खासदार, नाशिक