आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिन्नरचा पारा 4.6 अंशावर; रब्बीच्या प‍िकांना पोषक वातावरण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर: थंडीने सर्वच गारठून गेले असतानाच सोबतीला झोंबणारे वारेही वाहू लागल्याने थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. सकाळच्या वेळी बाहेर पडणार्‍यांची संख्या रोडावली असून, एरवी उशिरापर्यंत सुरू राहणार्‍या बाजारपेठेत रात्री 8 वाजताच सामसूम होताना दिसत आहे.
थंड हवामानामुळे रब्बीच्या पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पाण्याची कमतरता असतानाही गहू, हरभर्‍यासारखी पिके चांगली तरारली आहेत. ग्रामीण भागात जागोजागी पेटलेल्या शेकोट्यांभोवती ऊब घेत गप्पा मारत बसलेल्या आबालवृद्धांचे दृश्य नेहमीचे आहे, तर वाढलेल्या थंडीने शहर भागातही शेकोट्या धगधगू लागल्या आहेत.