आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिणीच्या पतीचा चाकूने भोसकून खून, बहिणीचा छळ करत असल्याचा हाेता राग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - बहिणीला मानसिक शारीरिक त्रास देत असल्याने संतापलेल्या भावाने बहिणीच्या पतीचा खून केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. रिक्षात बसवून नेत त्याने बहिणीच्या पतीवर चाकूने वार करीत त्यास ठार केले. अंबड पोलिसांना याबाबत माहिती मिळताच तातडीने तपास करत मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत असलेल्या या भावास अटक केली.
बहिणीचा पती अमोल केवल मोरे (२२, रा. सावतानगर) हा बहिणीला त्रास देत असल्याच्या रागातून संशयित राहुल केदू जमदाडे (२१, रा. उपेंद्रनगर) याने त्याचा काटा काढण्याचे ठरविले. त्यानुसार गुरुवारी राहुल त्याचे दोन मित्र रात्री अंबड औद्योगिक वसाहतीतील एका मैदानावर बसून मद्यप्राशन केल्यानंतर राहुलने त्याच्या रिक्षाने मित्रांना घरी सोडले. त्यानंतर रिक्षातून (एमएच १५, इएच २७५९) जाताना अमोलवर उत्तमनगर, त्रिमूर्ती चौक उंटवाडी या ठिकाणी थांबून चाकूने पोटात मानेवर वार केल्याने रक्तस्राव हाेऊन अमोल मोरे याचा मृत्यू झाला. याबाबत एका पोलिस मित्राने दिलेल्या माहितीनुसार, उपनिरीक्षक महेश इंगोले यांच्या पथकाने उंटवाडी पुलाजवळ प्रेताची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत असलेल्या राहुलला ताब्यात घेतले. पोलिसांनी अमोल यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.