आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येवल्याजवळ अपघात; सहा साईभक्तांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येवला - शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येणार्‍या भक्तांवर रविवारी पहाटे काळाने झडप घातली. येवला-मनमाड रस्त्यावरील गोपाळवाडी फाट्यावर पहाटे सहाच्या सुमारास ओम्नी व्हॅन व आयशर ट्रकच्या भीषण अपघातात सहा जण ठार तर 3 गंभीर जखमी झाले. सर्व मृत मध्य प्रदेशातील रहिवासी होत.

मनमाडमार्गे शिर्डीकडे जाणार्‍या भाविकांच्या ओम्नीला (जीजे 18,एबी 2901) येवल्याहून मनमाडकडे आयशर ट्रकने (एमपी 46 जी 0753) समोरून जबर धडक दिली. त्यात ओम्नीचालक पोलिस कर्मचारी रवींद्र रणजितसिंग चव्हाण (वय 30), जितेंद्र हनसिंग बगेर (वय 30), राकेश नारायण बगेर (वय 31) यांचा जागीच मृत्यू झाला तर चार वर्षाचा शैलेंद्र बगेर याला वडील पंकज बगेर यांच्या कुशीतच मृत्यूने गाठले. अनिल महेंद्र पटेल (वय 20) यांना अधिक उपचारार्थ नाशिक येथे नेण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. एका मृताचे नाव मात्र समजू शकले नाही. अनिल किराडे, राहुल बामनिया, पंकज बगेर हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर नाशिकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व मृत व जखमी मध्य प्रदेशमधील (रा. डेहेर, जि. धार) येथील आहेत.