आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा महिन्यांचे बाळ तरंगते तेव्हा..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - त्या बाळाचे वय आहे अवघे सहा महिने. सामान्य बाळांसारखे हसणारे, रडणारे हे बाळ पाण्यात ठेवले की सहज तरंगते आणि ते असामान्य असल्याची प्रचिती येते. रोनित चेतन खानापुरे नामक हे बाळ पाण्यात ठेवले की कधी सलग 4 मिनिटे तर कधी 3 मिनिटे सहजपणे तरंगू लागते आणि पंचवटीच्या तरणतलावावर हे आश्चर्य पाहणारेही टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद देतात.

काठे गल्ली परिसरात राहणारे खानापुरे कुटुंब मूळ येवल्याचे आहे. त्यांचा रोनित हा अवघ्या 6 महिन्यांचा मुलगा पाण्यात टाकले की लीलया तरंगतो. कदाचित तो विश्वविक्रमही ठरू शकतो, असा या कुटुंबाचा दावा आहे. रोनितची ही बाललीला प्रत्यक्ष पाहण्याची संधीही नागरिकांना येत्या सोमवारी सकाळी साडेदहा वाजता सावरकर तरणतलावावर मिळेल. विदेशात जन्मताच बाळांना पोहण्याचे प्रशिक्षण दिले जाते हे वास्तव रोनितचे आजोबा अरुण खानापुरे यांनी ऐकले होते आणि छोट्या रोनितलाही प्रशिक्षक राजेंद्र निंबाळते यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणिकेत सराव सुरू झाला.

असा आहे सराव..
0 प्रारंभी हात धरून पाण्यात तरंगण्याचा सराव. पाण्यावर पालथे टाकून काही क्षण हात सोडून देण्यास प्रारंभ.
0 रोनित चार महिन्यांचा झाल्यावर पाण्यावर सहजपणे पालथा तरंगू लागला.

चीनचा आदर्श : चीनची मुले 14 व्या वर्षी ऑलिम्पिकमध्ये पोहण्याच्या स्पध्रेत सुवर्णपदके पटकावतात. काही देशांमध्ये बालपणापासूनच पोहायला शिकवले जाते. मग आपल्याच देशात का नाही? या विचारातूनच हे धाडस करण्याचे ठरवले. मुलगा आणि सुनेनेही त्यात साथ दिली, असे छोट्या रोनितचे आजोबा अरुण मिठ्ठसा खानापुरे यांनी सांगितले.