आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलेजांत जागर आरोग्याचा, पदव्युत्तर अभ्यासक्रमात आता ‘स्किल डेव्हलपमेंट’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महाविद्यालयीनशिक्षणासाठी आजही कित्येक किलोमीटर पायी चालून जावे लागत असल्याने विद्यार्थिनींच्या शारीरिक आणि मानसिक ऊर्जेवर परिणाम होतो. गुणात्मक शिक्षणात मुली आघाडीवर असल्या तरी उपक्रमशीलतेत त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी आरोग्य सेवा योजनेंतर्गत महाविद्यालयांत प्रबोधनातून आरोग्याचा जागर होणार असून, त्याद्वारे त्यांचे सक्षमीकरण करणार असल्याची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी येथे दिली.
विद्यापीठाच्या विद्यार्थी आरोग्य सेवा योजनेंतर्गत आरोग्य केंद्रातर्फे ‘विद्यार्थिनी आरोग्य प्रबोधन’ या उपक्रमाचे उद््घाटन बुधवारी नाशिक उपकेंद्रात झाले. या वेळी कुलगुरू बोलत होते. याप्रसंगी कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू, बीसीयूडीचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड, विद्या गारगोटे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. गजानन खराटे, केंद्र समन्वयक डॉ. रावसाहेब शिंदे, सी. एन. कुलकर्णी आदी उपस्थित होते. डॉ. गाडे म्हणाले की, विविध कारणांमुळे मुलांच्या तुलनेत मुली महाविद्यालयीन विद्यापीठ स्तरावरील उपक्रमांत सहभागी होत नाहीत. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत अजूनही १०० टक्के लोक विकासाच्या प्रवाहात आलेले नाहीत. व्यापक परिवर्तनासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच सर्वांचा सहभाग गरजेचा आहे. शिक्षण क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य दिले जाऊन चांगले कौशल्याधिष्ठित मनुष्यबळ निर्माण करण्याची गरज आहे. विद्यार्थिनी आरोग्य प्रबोधन उपक्रमाचे उद‌्घाटन करताना कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे. समवेत डॉ. नरेंद्र कडू, विद्या गारगोटे आदी.
विकसित देशांच्या तुलनेत आपले विद्यार्थी कमी पडतात. त्यामुळे गुणात्मक शिक्षणाबरोबरच कौशल्याधिष्ठित शिक्षणासाठी केंद्र सरकारने स्किल डेव्हलपमेंटसाठी पुढाकार घेतला आहे. उपक्रमांतर्गत विद्यापीठाने अभियांत्रिकी फार्मसी अभ्यासक्रम वगळून पदव्युत्तर अभ्यासक्रमांत स्किल डेव्हलपमेंट उपक्रमाचा अंतर्भाव केला जाईल. विद्यापीठ प्रतिनिधी प्रत्येक जिल्ह्यात जाणार असून नाशिक जिल्ह्यात ११ ऑक्टोबरनंतर प्रतिनिधी येतील. चालू शैक्षणिक वर्षातील दुसऱ्या सत्रापासून स्किल डेव्हलपमेंटचा अंतर्भाव होईल, अशी माहितीही कुलगुरूंनी दिली.
मुलींच्या आरोग्याची घेणार काळजी
महाविद्यालयीनविद्यार्थिनींमध्ये रक्तातील लोह, हिमोग्लोबीनची कमतरता, मासिक पाळीदरम्यानच्या तक्रारी, समज गैरसमज, स्वच्छता, आहारशास्त्र, स्वसंरक्षण याची मोफत तपासणी कार्यशाळा घेतली जाईल. विद्यापीठांतर्गत पुणे, अहमदनगर नाशिक जिल्ह्यातील ९३५ महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या साडेतीन लाख विद्यार्थिनींच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे.
असा आहे उपक्रम
उपक्रमदोन भागांत होणार असून पहिल्या टप्प्यात हिमोग्लोबीन तपासणी होईल. पेक्षा कमी हिमोग्लोबीन असल्यास रक्तवाढीच्या गोळ्या मोफत दिल्या जातील. दुसऱ्या टप्प्यात महाविद्यालयांत आरोग्यविषयक कार्यशाळा घेणार असून, त्यासाठी 100 महिला प्राध्यापकांना प्रशिक्षित केले जाईल. आहारशास्त्र, स्वच्छता, व्यसनाधीनता, वर्तन धोके, मानसिक औदासीन्य, ताण त्याचे व्यवस्थापन, महिला कायद्याची ओळख, अभ्यास वैयक्तिक जबाबदारी यांचा समतोल, स्वसंरक्षण (लैंगिक छळ, आकलन प्रतिक्रिया) आणि स्त्रियांचे आजार त्याबाबत माहिती या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.