आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Small Actor Ovi Dixit Act In Kalidas Mandir Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘किडनॅप’च्या थरारक प्रयोगात चमकली नाशिकची ओवी दीक्षित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - कुटुंब व्यवस्थेचा परीघ संकुचित होत असताना आणि मुलांसाठी पालकांकडे वेळ कमी होत असलेल्या सध्याच्या युगातील थरारक कौटुंबिक नाट्य म्हणजे किडनॅप. नाशकात रविवारी कालिदास कलामंदिरमध्ये सादर होणार्‍या ‘किडनॅप’च्या प्रयोगात नाशिकची बालकलाकार ओवी दीक्षित ही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक कुमार सोहनी यांच्यासह लेखक सुहास दाते, अभिनेते सुहास पळशीकर, नंदिनी वैद्य-रेगे, बालकलाकार ओवी दीक्षित, सीमा दीक्षित आदींनी या विषयी शनिवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
संस्कारांचे अपहरण - कुटुंब व्यवस्थेतूनच संस्कारांचे अपहरण होत आहे. पैशामागे धावणार्‍या पालकांना आपल्या पाल्याचे प्रश्न समजून घ्यायला, ते सोडवायला वेळ नाही. समाजात अत्यंत गंभीर बनत असलेल्या या प्रश्नावर प्रकाश टाकण्याचा या माध्यमातून प्रयास केला आहे. सुहास दाते, लेखक

पहिलेच नाटक - व्यावसायिक नाटकात काम करण्याचा हा पहिलाच अनुभव असून, ही संधी माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. नाटकाला प्रेक्षकांचा थेट प्रतिसाद लाभत असल्याने हा एक अनोखा अनुभव माझ्यासाठी मी मोलाचा मानते. ओवी दीक्षित, कलाकार
प्रदीर्घ कालावधीनंतर रंगमंचावर प्रवेश - प्रदीर्घ कालावधीनंतर माझा रंगमंचावर प्रवेश होत असल्याने हे नाटक माझ्यासाठी नवीन आव्हान आहे. हे नाटक म्हणजे एक कौटुंबिक थरारपट असून, घरातील प्रत्येकाला ते पाहता येण्यासारखा आहे. कुटुंबातील विविध विषयांवर या नाट्याच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला आहे. कलाकारांनी कला पणाला लावली आहे. विविध विषय हळुवार मनाला स्पर्शून जात असल्याने या नाटकाचे वेगळेपण प्रेक्षकांना दिसून येईल. सुहास पळशीकर, प्रख्यात अभिनेते