नाशिक-दि.ऑक्टोंबरच्या महात्मा गांधी जयंतीपासून ऑक्टोंबरच्या बकरी ईदपर्यंत आलेल्या सलग सुट्यांचा फटका शहरातील 7000-8000 लघु मध्यम उद्योगांना बसणार आहे. बँकांच्या सुट्यांमुळे अबकारी कराच्या भरण्याची मुदत टळल्याने व्याजाचा भुर्दंड तर उद्योजकांना मोजावा लागणार आहेच, शिवाय उत्पादनाच्या डिलिव्हरीही द्यायलाही उशीर होणार आहे. सीटीएस प्रणालीच्या जमान्यातही चार-पाच दिवस चेक क्लिअरिंगला लागत असल्याने इसीएस क्लिअर होण्यातही अडचणी असल्याने विनाकारण भुर्दंड सहन करावा लागणार आहे. ऑनलाईन व्यवहारही ठप्प होते, त्याचा फटकाही उद्योगांना सहन करावा लागणार आहे.
दीड कोटी ते पाच कोटी रुपयांपर्यंत ज्या द्योगांना उलाढाल आहे, अशा उद्योगांना त्रैमासिक, तर पाच कोटी रुपयांवर उलाढाल असलेल्या उद्याेगांना दर महिन्याच्या एक ते पाच तारखेपर्यंत अबकारी कराचा भरणा करावा लागतो. त्यानंतर उत्पादनाची डिलिव्हरी देता येते. या महिन्यात शनिवारच्या अर्धा दिवस कामकाजाचा अपवाद वगळता तारखेपर्यंत सलग सुट्या आल्याने हजाराच्या आसपास उद्योगांना हा कर भरता आलेला नाही. मंगळवारपासून त्याचा भरणा करता येणार असला तरी व्याजाचा विनाकारण भुर्दंड उद्योगांना भरावा लागणार आहे. यामुळे डिलेव्हरी देण्यासही विलंब होणार असून, डिलिव्हरीनंतर मिळणारे पेमेंटही यामुळे उशिराने उद्याेजकांच्या हाती येणार आहे.
सलग सुट्या हानिकारक
सलगसुट्यांमुळे व्यवहार ठप्प झाले. पण, मंगळवारपासून त्याला वेग येणार आहे. ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अशा सुट्या उद्योजकच नाही तर सर्वसामान्यांकरिताही हानिकारक आहेत. अबकारी कर आणि मासिक पेमेंटकरिता मुदत वाढवून द्यायला हवी. ज्ञानेश्वरगोपाळे, माजीअध्यक्ष, आयमा