आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Smart Boards, E learning Education Support Of Class

स्मार्ट बोर्ड, इ-लर्निंग प्रयोगास तासिकांची जोड, मानवधन संस्थेच्या शाळांत उपकम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- एका बाकावरील दोन विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र पुस्तके आणता दोघांनी मिळून तीन-तीन पुस्तके शाळेत आणावे. तसेच तीन मोठ्या वह्यांमध्ये प्रत्येकी दोन भाग करून एका वहीत दोन विषयांचे लेखन करावे.
शाळेत पाण्याची सुविधा असल्याने पाण्याची बाटलीही आणण्याची गरज नाही, अशा उपाययोजनांमुळे दप्तराचे ओझे २० ते ३० टक्के हलके होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर शालेय अभ्यासक्रमात आधुनिक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करत मानवधन शैक्षणिक संस्थेने स्मार्ट बोर्ड आणि इ-लर्निंगचा प्रयोग राबविण्याचा निर्णय घेतला आहे. तर, नवरचना शाळेनेही वह्या पुस्तकांची संख्या कमी ठेवण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी होणार आहे.

शालेय दप्तराचे ओझे प्रमाणापेक्षा अधिक असल्याने विद्यार्थ्यांना पाठदुखीचे त्रास उर्वरित.पान
प्रचंड अभ्यासाचं मानसिक अाेझं अाणि ताे पूर्ण करण्यासाठी पाठीवर दप्तराचं अाेझं. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील हे अाेझं हलकं व्हावं, अशी पालकांची मनापासून इच्छा अाहे. किंबहुना, न्यायालयानेही ‘दप्तर कमी करा’, अशा सूचना केल्या अाहेत. तसेच, अनेक डाॅक्टरांनीही टिप्पणी करत वजन कमी करण्याची गरज अधाेरेखित केली अाहे. हेच दप्तर हलकं करण्यासाठी ‘दिव्य मराठी’ पुढाकार घेत अाहे. शाळा-शाळांमध्ये जाऊन संस्थाचालकांना विचारणा करण्यात येणार असून, संस्थेत न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली का? किती अाेझे कमी झाले? जर भविष्यात दप्तराचे अाेझे कमी करणार असाल तर किती दिवसांत...! अशा सर्व बाबींवर शाळा संस्थाचालकांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांचे अाेझे कसे कमी हाेईल, यासाठी प्रयत्न केला जाईल. यासंदर्भातील ‘दिव्य मराठी’ची ठाेस भूमिका देत अाहाेत. याविषयी संस्थाचालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांचेही काही नवीन प्रयाेग असतील तर त्यांनीही अामच्या प्रतिनिधीशी ९०२८७०१९७३याक्रमांकावर संपर्क साधावा.

तीनच वह्यांची गरज
शाळेतीलदप्तरातसर्वच विषयांची पुस्तके तसेच स्वतंत्र वह्यांची गरज नाही. दप्तरात केवळ तीनच वह्या अनिवार्य करण्यात येतील. भाषा विषयांची पुस्तके असतील. पाण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. - किशोर पालखेडकर, मुख्याध्यापक,नवरचना शाळा

तासिकांचे नियाेजन
विद्यार्थ्यांचेदप्तरकमी करण्यासाठी शाळेचे सुधारित वेळापत्रक तयार करून तासिकांचे नियोजन केले जाईल. एकाच दिवशी जोड तासिका तयार करून वह्या पुस्तकांची संख्या घटवली जाईल. ज्योती कोल्हे, मुख्याध्यापिका,धनलक्ष्मी शाळा
मानवधन संस्थेच्या शाळेमध्ये स्मार्ट बाेर्डद्वारे अध्यापन.

१० टक्के एवढेच ठेवणार दप्तराचे वजन...
धनलक्ष्मीबालविद्यामंदिरात स्मार्ट बोर्ड लावले असून, इ-लर्निंगचा प्रयोगही केला जाणार अाहे. सप्ताहात एक दिवस दप्तरमुक्त करून वाचनदिन ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार अाहे. मुलांच्या वजनाच्या १० टक्के एवढेच दप्तराचे वजन ठेवण्यात येणार अाहे.