आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटीसाठी भाजपचे ठराव विखंडन अस्त्र, अामदार, नगरसेवक मुख्यमंत्र्यांना भेटणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेच्या स्वायत्ततेवर घाला घालणाऱ्या स्पेशल पर्पज व्हेइकल (एसपीव्ही) या कंपनीकरणाला विराेध करणाऱ्या महासभेचा ठराव विखंडित करण्यासाठी साेमवारी मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्याचा निर्णय घेतल्याची माहिती भाजप अामदार देवयानी फरांदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महापालिकेत सत्ताधारी मनसे अपक्षांकडून घटनाबाह्य कामे करण्याचा सपाटाच सुरू असल्याचा अाराेप करीत महापाैर अशाेक मुर्तडक हे सभागृहाच्या मताविराेधात निर्णय देत अाहेत, तर उपमहापाैर गुरुमित बग्गा यांना उद्देशून विशिष्ट एका व्यक्तीसाठी एसपीव्ही रद्द करण्याचा घाट घातला जात असल्याचाही दावा त्यांनी केला.
स्मार्ट सिटीचा प्रस्ताव करवाढ एसपीव्ही फेटाळून मंजूर करण्याच्या हालचाली सुरू अाहेत. या पार्श्वभूमीवर भाजप अामदार फरांदे, सीमा हिरे, शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, विजय साने, सुनील केदार, प्रा. कुणाल वाघ यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी फरांदे यांनी एसपीव्ही रद्द करण्याची बाब राजकीय डाव असल्याची टीका केली. त्या म्हणाल्या की, स्मार्ट सिटीसाठी तीन महिन्यांपासून तयारी सुरू अाहे. विशेष म्हणजे, जागृतीसाठी हाेणाऱ्या सभांना महापाैर, उपमहापाैरांची हजेरी हाेती. मात्र, त्यावेळी त्यांना एसपीव्हीला विराेध करण्याची गरज का वाटली नाही? विशेष महासभेत बहुतांश नगरसेवकांनी स्मार्ट सिटीचा प्रस्ताव करवाढ फेटाळून मंजूर करण्याचे मत व्यक्त केले हाेते.
केवळ उपमहापाैर बग्गा यांच्याबराेबर दाेन वा चार नगरसेवकांनी एसपीव्ही फेटाळण्याची मागणी केली हाेती, मात्र महापाैरांनी सभागृहाचा विचार करता बग्गा यांचेच मत ग्राह्य धरल्याचे दिसते. असे प्रकार नियमबाह्य असून, अलीकडच्या काळात अशा घटनाबाह्य कामांचे प्रमाण वाढल्याचाही अाराेप केला. मुळात प्रश्न प्रस्ताव मंजूर वा नामंजुरीचा असून, महासभा सार्वभाैम असल्यामुळे केंद्र राज्य शासनाचा त्यात हस्तक्षेप करण्याचा संबंधच नाही. मात्र, प्रस्ताव मंजूर करताना एसपीव्हीसारखी मूलभूत अट रद्द करण्याची बाब हे राजकारण अाहे. एसपीव्ही एक समिती असून, त्यामुळे महापालिकेच्या स्वायत्ततेवर काेणताही घाला घातला जाणार नसल्याचाही दावा त्यांनी केला. एसपीव्ही घटनाबाह्य नसून, या समितीमुळे स्मार्ट सिटीच्या कामावर अंकुश असेल त्यासाठी काही नवीन कायदे करावे लागणार असतील तर केंद्र शासन नक्कीच करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सत्ताधारी मनसे-अपक्ष युतीकडून घटनाबाह्य काम हाेत असून, एसपीव्ही फेटाळून ठराव केला असेल तर ताे विखंडनासाठी भाजप प्रयत्न करेल. त्यासाठी विधिमंडळ अधिवेशन सभागृहात तसेच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. घंटागाडीचा ठेका प्रथम दहा वर्षांसाठी टीका झाल्यानंतर पाच वर्षांसाठी करण्याची बाब घटनाबाह्य असून, सातत्याने भूमिकेशी फारकत घेण्याची मनसेची बाब दुर्दैवी असल्याचा टाेला लगावला.
ऊठ नाशिककर जागा हो, स्मार्ट सिटीचा धागा हो,’ अशा विविध घोषणा देत आमदार देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी मेनरोड परिसरातील गाडगे महाराज पुतळ्यापासून ‘सपाेर्ट स्मार्ट सिटी’ अभियानाची सुरुवात झाली. यावेळी नगरसेवक प्रा. कुणाल वाघ, सुरेश पाटील, व्हीनस वाणी, संजीव नारंग, किरण चव्हाण, आयमाचे राजेंद्र आहिरे, विवेक पाटील आदी उपस्थित होते. यावेळी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात अाल्या. दरम्यान, पत्रकार परिषदेत उपस्थित असणारे भाजपचे अामदार सीमा हिरे, शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, विजय साने अन्य पदाधिकाऱ्यांनी सिडकाेतील कार्यक्रमाचे कारण देत उद््घाटनाच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या अभियानाकडे पाठ फिरवली.

उपमहापाैरांचा विराेध संदर्भहीन
महापालिकेला कंपनी करता येत नाही, अशा उपमहापाैर गुरुमित बग्गा यांच्या वक्तव्यांना संदर्भ नसल्याचाही अाराेप त्यांनी केला. नवीन तरतुदी करण्याचे सर्वाधिकार शासनाकडे अाहेत. पालिकेला कंपनी करण्यासाठी कायदेशीर मार्ग अाहे. निव्वळ राजकीय विराेधासाठी बग्गा अाराेप करीत असून, त्यांच्या तालावर मनसे नाचत असल्याची बाब दुर्दैवी असल्याचाही चिमटा त्यांनी काढला.
बातम्या आणखी आहेत...