आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्मार्ट सिटी’ नाशिकच्या सर्वांगीण वाढीस पाेषक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - केंद्र शासनाच्या याेजनेअंतर्गत नाशिकला स्मार्ट सिटी बनविण्याचा प्रस्ताव नाशिकची प्रगती अाणि सर्वांगीण विकासासाठी पाेषक ठरेल. तसेच, या पर्यायाने माेठ्या प्रमाणात बाहेरील गुंतवणूक येणेही शक्य हाेणार असल्याचे मत शहरातील प्रख्यात व्यावसायिक, उद्याेजक, वास्तुविशारद अाणि लाेकप्रतिनिधींनी व्यक्त केले अाहे.
स्मार्ट सिटी बनण्याने शहरातील सर्व शासकीय प्रणालीत ई-गव्हर्नन्स, वायफायसारख्या तांत्रिक बाबींची पूर्तता हाेण्यासह पायाभूत साेयीसुविधांनी परिपूर्ण शहर बनणे शक्य हाेणार अाहे. त्याचा फायदा शहरातील प्रत्येक घटकाला मिळू शकणार असल्याचा सूर मान्यवरांनी व्यक्त केला अाहे.


याेजनेचा फायदा १०० टक्के
स्मार्टसिटी झाल्यास नाशिकला १०० टक्के फायदा हाेईल. मात्र, स्मार्ट सिटीचा प्रस्ताव पहिल्या फेजमध्ये घेतला गेल्यास त्याचा सर्वाधिक लाभ मिळू शकताे. अद्ययावत तंत्रज्ञान, पायाभूत साेयीसुविधांसह प्रामुख्याने ग्रीन कन्सेप्ट, तसेच सामाजिक सुरक्षेसारख्या बाबींचा लाभ शहरवासीयांना मिळेल. अभयतातेड, उपाध्यक्ष क्रेडाई, नाशिक

सर्वार्थाने साहाय्यभूत
ई-गव्हर्नन्समुळेकाे- अाॅर्डिनेशनच्या अनेक बाजू सुलभ हाेणार अाहेत. काेणत्याही प्रकारच्या नव्या सेटअपसाठी तयार पायाभूत सुविधा अाणि अत्याधुनिक तंत्रज्ञान हे वरदान असते. स्मार्ट सिटी झाल्यास शहराला प्रमाेट करण्यास ते सर्वार्थाने साहाय्यभूत ठरेल. चंद्रकांतधामणे, वास्तुविशारद

स्वागत...
देशभरात नाशिकची ख्याती पसरेल
नाशिककरांसाठी ही अत्यंत अानंदाची बाब असून, त्यामुळे नाशिक शहराची ख्याती देशभर हाेणार अाहे. यामुळे नाशिकचा अाैद्याेगिक विकास हाेणारच अाहे, त्याचबराेबर स्वच्छ सुंदर नाशिक, सुरक्षित शहर, अाय.टी. हब, ट्रान्सपाेर्ट, मंत्रभूमीसाठी गाेदा प्रदूषण मुक्ती गरजेची अाहे. अामदार सीमा हिरे

सर्वच क्षेत्रांचा विकास हाेईल
याशहराचे स्मार्ट सिटीत रूपांतर हाेताना ते ग्रीन, क्लीन सुरक्षित शहर म्हणून नावारूपास यावे. पर्यावरण गाेदा प्रदूषण मुक्तीकडे विशेष लक्ष देण्याची गरज अाहे. विमानतळ सुरू हाेत असल्याने अाैद्याेगिक शैक्षणिक हब, अाय.टी. क्षेत्राचा विकास हाेणार अाहे. त्यामुळे वाहतूक वाढणार असल्याने स्वतंत्र सायकल ट्रॅक, पादचारी मार्ग गरजेचे अाहेत. अामदार देवयानी फरांदे