आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्मार्ट सिटी’तील शहरांची घाेषणा प्रजासत्ताकदिनी शक्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - स्मार्टसिटी चॅलेंजमध्ये सहभागासाठी नाशिक महापालिकेने काही अटी-शर्तींचा समावेश असलेला महासभेचा ठराव केंद्रीय नगरविकास मंत्रालयात पाठविला अाहे. याशिवाय, अन्य शहरांचे ठरावदेखील नगरविकास मंत्रालयात दाखल झाले असून, त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यातील दहा शहरांची निवड करण्याच्या प्रक्रियेने जाेर धरला अाहे. २६ जानेवारी राेजी पहिल्या टप्प्यातील शहरांची घाेषणा करण्याची तयारी सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटी याेजनेला प्रारंभी नाशिकमधून सकारात्मक प्रतिसाद मिळाला हाेता. परंतु, याेजनेतील स्पेशल पर्पज व्हेइकल (एसपीव्ही)च्या मसुद्याची माहिती लाेकप्रतिनिधींना मिळाल्यानंतर त्यास महापालिकेतून जाेरदार विराेध झाला. महासभेत यावर प्रदीर्घ काळ चर्वितचर्वण झाले. एसव्हीपीमुळे महापालिकेची स्वायत्तता धाेक्यात येणार असल्याचा अाक्षेप घेत महासभेने स्मार्ट सिटीतून एसव्हीपी वगळण्याचा ठराव केला हाेता. परंतु, अायुक्तांच्या अाग्रहानंतर सर्वपक्षीय गटनेत्यांना पुन्हा एकदा स्मार्ट सिटीचे महत्त्व विशद करण्यात अाले. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर प्रस्तावास सशर्त अटींद्वारे मंजुरी देण्यात अाली. त्यात एसपीव्हीला अाता ‘नाशिक महापालिका कंपनी’ असे नाव देण्याची अट टाकण्यात अाली.
एसपीव्हीच्या प्रस्तावाला सर्वपक्षीय गटनेत्यांनी सशर्त अटींद्वारे मंजुरी दिली. या संबंधित उपसूचनांसह महासभेचा ठराव केंद्र सरकारच्या नगरविकास विभागात १५ डिसेंबरला रवाना करण्यात अाला अाहे. येत्या २६ जानेवारी राेजी यावर निर्णय हाेण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत अाहे. यासाठी नगरविकास मंत्रालयाने तज्ज्ञांच्या समितीसमाेर हे सर्व प्रस्ताव सादर केले अाहेत.