नाशिक - नाशिककरांनी स्मार्ट सिटीसाठी ९० हजार उपयुक्त सूचना पाठविल्या असून, अाता महापालिका त्याची छाननी करून अादर्श सूचनांचा अंतर्भाव प्रस्ताव तयार करण्यासाठी करणार अाहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पात लाेकसहभागाच्या दृष्टीने अादर्श सूचना पाठविण्याचे अावाहन करण्यात अाले हाेते. त्यानुसार ९० हजार लाेकांनी सूचना पाठविल्या अाहेत. ३१०० लाेकांनी अाॅनलाइन सूचना पाठविल्या अाहेत.
विविध स्पर्धांमधील विजेत्यांची नावे महापाैर जाहीर करणार अाहेत. लाेगाे स्पर्धत दीडशे स्पर्धक, तर स्मार्ट सिटी व्हीजनसाठी २५० लाेकांनी सहभाग घेतला. नवीन क्षेत्र विकसित करण्याच्या सूचनांमध्ये प्रामुख्याने मखमलाबाद तपाेवन, तर रेट्राे फिटिंगमध्ये पंचवटी, जुने नाशिकची नावे सुचविण्यात अाली आहेत.