आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटी ‘लाइक्स’साठी पालिकेची धडपड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - 'स्मार्टसिटी'च्या प्रस्तावातील सहभागासाठी महापालिकेच्या दृष्टीने अाता साेशल मीडिया कळीचा मुद्दा ठरला असून, दिल्ली येथे झालेल्या बैठकीत अधिकाधिक लाइक्स असतील तरच 'स्मार्ट सिटी'चा प्रवास सुकर हाेईल, असे उच्चपदस्थांनी सांगितले आहे. त्यासाठी आता महापालिकेची धडपड सुरू झाली असून, महापालिकेच्या विविध याेजनांबाबत व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटरवर असलेल्या माहितीला लाइक करून याेगदान देण्याचे आवाहन अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी केले अाहे.

'स्मार्ट सिटी' याेजनेत निव्वळ अचूक प्रस्ताव उपयाेगाचे नसून, लाेकसहभागदेखील महत्त्वाचा अाहे. लाेकांचा सहभाग वाढला तर परिपूर्ण नियाेजन हाेईल, असाही हाेरा अाहे. 'स्मार्ट सिटी'च्या पहिल्या यादीत नाशिकपेक्षा तुलनात्मकदृष्ट्या पिछाडीवर असलेल्या साेलापूरची निवड झाली. त्यावेळी घेतलेल्या अाढाव्यात नाशिक लाेकसहभागाच्या निकषात कमी पडल्याचे लक्षात अाले हाेते. दरम्यान, दिल्ली येथे 'स्मार्ट सिटी'च्या प्रस्तावाबाबत शहर विकास मंत्रालयातील बैठकीत लाेकसहभागाचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे सांगण्यात अाले. या पार्श्वभूमीवर अाता महापालिकेने साेशल मीडियावरील लाइक्स मिळवण्यासाठी धडपड सुरू केली अाहे.

कुंटेंकडे 'एसपीव्ही'चे सुकाणू
'स्मार्टसिटी'त सहभागासाठी स्पेशल पर्पज व्हेईकलचे (एसपीव्ही) स्वतंत्र प्राधिकरण महत्त्वाचा घटक अाहे. त्याचे अध्यक्षपद प्रधान सचिवांना दिले जाणार असल्याचे पुणे साेलापूर येथील प्रस्तावांवरून स्पष्ट झाले अाहे. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या प्रस्तावासाठीचे नियंत्रक मुंबई महापालिका अायुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे हे पद जाण्याची शक्यता अाहे.

असे अाहे अावाहन
मनपाचे सोशल मीडियावरील अस्तित्व स्मार्ट सिटी प्रस्तावात आकडेवारीसह दाखवणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण सर्वांनी पुढील लिंक्सना लाइक/फॉलो करावे.
फेसबुक : www.facebook.com/nashikcorporation
(यावरील आपणास आवडणाऱ्या पोस्ट शेअर करत राहावे)
ट्विटर : www.twitter.com/NashikCorp
तसेच, अँड्रॉइड फोनसाठी पुढील लिंकवरून स्मार्ट नाशिक हे मनपाचे अॅप येथे डाउनलोड करावे :
https://play.google.com/store/apps/details?id=com.swt.nmc.smartnashik
आपल्याकडे आयफोन असल्यास या लिंकवर क्लिक करा :
https://itunes.apple.com/in/app/smart-nashik/id1102398897?mt=8
त्याचप्रमाणे आपल्या सर्व व्हाॅट्सअॅप ग्रुपमध्ये ७७६८००२४२४ हा क्रमांक समाविष्ट करावा किंवा आपण या क्रमांकावर मेसेज टाकून पालिकेच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हावे. यावर आलेले मेसेज फॉरवर्ड करत राहावेत.
बातम्या आणखी आहेत...