आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Smart City's Initiative For All Air Police Commissioner S. Jagannathan

‘स्मार्ट सिटी’साठी हवा सर्वांचा पुढाकार, पाेलिस अायुक्त एस. जगन्नाथन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ‘स्मार्टसिटी’ हा सातत्यपूर्ण चालणारा उपक्रम असून, त्यात प्रत्येक नागरिकाने सहभागी हाेणे गरजेचे अाहे. सरकारी पाेलिस अधिकाऱ्यांनीही सध्याच्या कार्यपद्धतीत बदल करून ती अधिक जलद कशी हाेईल, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पाेलिस अायुक्त एस. जगन्नाथन यांनी केले.
कन्फेडरेशन अाॅफ इंडियन इंडस्ट्री (सीअायअाय)च्या वतीने अायबीज हाॅटेलमध्ये मंगळवारी झालेल्या स्मार्ट सिटीविषयक चर्चासत्रात जगन्नाथन स्मार्ट सिटीबाबत अापली भूमिका स्पष्ट करीत हाेते. व्यासपीठावर महापालिका अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम, सीअायअाय नाॅर्थ महाराष्ट्र काैन्सिलचे अध्यक्ष सुधीर मुतालिक, ‘सीअायअाय’च्या इन्फ्रास्ट्रक्चर विभागाचे वरिष्ठ सल्लागार डाॅ. मानवेंद्र देसवाल हाेते.
कुंभमेळ्यातून नाशिक स्वच्छ सुरक्षित शहर असल्याचा संदेश देशभरात पाेहाेचला असून, हे केवळ शहरातील नागरिक, उद्याेग शासकीय यंत्रणांच्या उत्तम सहकार्यामुळे शक्य झाल्याकडे लक्ष वेधतानाच शहराशी संबंधित सगळ्यांनीच एकत्रित काम करण्याची गरज जगन्नाथन यांनी या वेळी व्यक्त केली. स्मार्ट सिटीसाठी विविध पावले उचलण्यास सुरुवात झाली असून, स्मार्ट अॅप हे त्यातील पहिले पाऊल अाहे. या अॅपमुळे नागरिकांना तक्रारी सूचना करणे साेपे झाले असून, प्रशासनालाही मदत हाेत अाहे. महापालिकेने राबविलेल्या सर्वेक्षणातून नागरिकांची नेमकी गरज काय अाहे, ते समाेर अाले असून, अामच्याकडे असलेल्या संकल्पनांपेक्षा काही वेगळ्या अाणि चांगल्या संकल्पनाही प्राप्त झाल्या असल्याचे महापालिका अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी या वेळी सांगितले. बाेस्टन अाणि न्यूयाॅर्क यांसारख्या स्मार्ट शहरांची उदाहरणेही त्यांनी दिली, शिवाय प्रत्येक स्मार्ट शहराच्या निर्मितीत उद्याेगांचे याेगदान माेलाचे ठरते म्हणूनच ‘सीअायअाय’चे सदस्य अाणि उद्याेजकांना यात सहभागाचे अावाहन डॉ. गेडाम यांनी केले. सुधीर मुतालिक यांनी उपस्थितांचे स्वागत करताना स्मार्ट सिटीबाबत आपली भूमिका मांडली.
‘सीअायअाय’ची महत्त्वाची भूमिका : डाॅ. मानवेंद्र देसवाल
‘सीअायअाय’चीभूमिका स्मार्ट सिटीज््च्या उभारणीसाठी महत्त्वाची असून, धाेरण ठरविताना सल्लागाराची भूमिका सीअायअाय पार पाडते अाहे. तीन देशांशी सामंजस्य करार करण्यात अाला असून, स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत अांध्र प्रदेश सरकारशी असा करार करण्यात अाला असून, चंदिगड, इंदूर, पणजी अाणि नेल्लाेर प्रशासनासाेबत कामही सुरू असल्याचे इन्फ्रास्ट्रक्चर विभागाचे वरिष्ठ सल्लागार डाॅ. मानवेंद्र देसवाल यांनी स्पष्ट केले.

‘सीअायअाय’तर्फे मंगळवारी झालेल्या स्मार्ट सिटीविषयक चर्चासत्रास उपस्थित मान्यवर. इन्सेटमध्ये मार्गदर्शन करताना पाेलिस अायुक्त एस. जगन्नाथन.