आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भूल देण्यासाठी स्मार्टफोनची मदत शक्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - स्मार्ट फोन, लॅपटॉप, अँप्स यांसारख्या दैनंदिन वापरातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ‘गॅजेट्स’ द्वारे मिळणारी माहिती भूल देण्यासाठी अचूकपणे वापरता येणे शक्य आहे. शस्त्रक्रियेपूर्वी भूल देताना सध्या वापरल्या जात असलेल्या औषधांपेक्षा कमीत कमी औषधांचा डोस देऊन योग्य तो परिणाम साधणे शक्य असल्याचे मत कोल्हापूर येथील प्रसिद्ध भूलतज्ज्ञ डॉ.शकिल मोमीन यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय भूलतज्ज्ञ संघटनेच्या राज्यस्तरीय परिषदेच्या समारोपप्रसंगी ‘भूलशास्त्रात नवीनतम गॅजेट्सचा वापर ’ या विषयावर मोमीन बोलत होते. रुग्णाच्या नाडीचे ठोके, रक्तदाब यावर लक्ष ठेवून ते मोजणारे मॉनिटर मशिन्स भूलतज्ज्ञ वापरत असून नवीन तंत्रज्ञानाने भूल देण्याची वर्कस्टेशन्स ऑपरेशन थिएटरमध्ये आता आहेत.

अत्याधुनिक तंत्रज्ञान पद्धतीची माहिती भूलशास्त्रासंदर्भातील गॅजेट्स डाऊनलोड करून उपलब्ध होते, ज्यामुळे कमीत कमी औषधांच्या वापराने सुयोग्य भूल देणे शक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

अल्ट्रासोनोग्राफी यंत्राचा वापर ऑपरेशन थिएटरमध्ये जास्तीत जास्त कसा करता येईल याबाबत हैदराबाद येथील तज्ज्ञ डॉ. टी.एस.गोपाल यांनी मार्गदर्शन केले. मणक्यांतून भूल देण्याच्या प्रकरणांत अल्ट्रासोनोग्राफीचा वापर करून त्यातील निश्चित भूल देण्याची जागा शोधता येते. भूल देण्यासाठी साउंड सोनोग्राफीचाही वापर हवा याकडे त्यांनी लक्ष वेधले. भूल देताना कोणत्या प्रकारचे सलाइन्स वापरावेत याबाबत डॉ.जे.व्हि. दिवाटिया यांनी मार्गदर्शन केले.