आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिव्य मराठी’ उत्सवात उद्या ‘सं. संशयकल्लाेळ’, प्रशांत दामले, राहुल देशपांडे यांची जादू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नाशिककर वाचकांच्या साथीने अाणि साक्षीने ‘दिव्य मराठी’ जुलै राेजी पाच वर्षे पूर्ण करत अाहे. त्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘दिव्य मराठी’ उत्सवाच्या माध्यमातून वाचकांसाठी सांस्कृतिक मेजवानीला ‘संगीत संशयकल्लाेळ’ या नाटकाने सुरुवात हाेणार अाहे. साेमवारी (दि. १३) सायंकाळी वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात हा प्रयाेग हाेणार अाहे.

मराठी नाट्यसृष्टीत गोविंद बल्लाळ देवल यांच्या ‘संगीत संशयकल्लोळ’ या नाटकाने इतिहास निर्माण केला. आजही हे नाटक रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या नाटकातील गाणी, पदे आजही रसिकांना तितकीच भावतात. असे हे रसिकप्रिय नाटक प्रशांत दामले फॅन फाउंडेशनने नवीन स्वरूपात मराठी रसिकांसमोर आणले अाहे. निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित या संगीत नाटकामध्ये प्रशांत दामले राहुल देशपांडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. आपल्या दमदार अभिनयामुळे रसिकांना भुरळ घालणाऱ्या आणि नाट्यगृहात रंगभूमीवर पाऊल ठेवताच टाळ्या-शिट्यांच्या आवाजात स्वागत होणाऱ्या प्रशांत दामले यांच्या नाटकाचे आकर्षण नाट्यप्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. दुसरीकडे, ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटातून घराघरांत पोहोचलेल्या, नाट्यसंगीताला अनोळखी असलेल्या तरुणवर्गाच्या गळ्यातील ताईत बनलेल्या राहुल देशपांडे यांचाही या नाटकात दमदार अभिनय आहे.

याविषयी प्रशांत दामले म्हणाले की, हे नाटक १०० वर्षांपूर्वीचे असले तरी आजही ताजे आहे. नव्या पिढीपुढे हे नाटक यावे, यासाठी आम्ही हा प्रयत्न केला आहे. मूळ नाटकात ३० गाणी होती, आम्ही त्यातली १८ गाणी ठेवत हे नाटक सादर करत आहोत. या नाटकात प्रशांत दामले (फाल्गुनराव), राहुल देशपांडे (अश्विनशेठ), उमा पळसुले-देसाई (रेवती), दीप्ती माटे (कृत्तिका), चिन्मय पाटसकर (साधू आणि वैशाख), नचिकेत जोग (भादव्या), नीता पेंडसे (रोहिणी आणि मघा) यांच्या भूमिका आहेत. या नाटकाचे प्रायाेजकत्व शांतुषा डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स यांनी स्वीकारले अाहे.

प्रयाेग फक्त निमंत्रितांसाठी
‘संगीत संशयकल्लाेळ’ या नाटकाचा प्रयाेग फक्त निमंत्रितांसाठी अाहे. पासधारक निमंत्रितांनाच या प्रयाेगाला प्रवेश दिला जाणार अाहे, याची कृपया रसिकांनी नोंद घ्यावी.
बातम्या आणखी आहेत...