आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: नागाची चपळाई अन् थरार...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- आडगाव परिसरातील शरयू पार्क येथे राहणार्‍या कदम कुटुंबीयांच्या घरात ठाण मांडलेल्या नागाला सर्पमित्र माणिक कुमावत यांनी सोमवारी मोठय़ा चपळाईने पकडले. बेडुक पकडण्यासाठी पेटीमागील नाग झेपावला आणि बाजूला अभ्यास करणार्‍या शाम कदमचे लक्ष गेले. त्याने घरच्यांना ओरडून सावध केले आणि भावाला फोन करत सर्पमित्राला बोलवलं. पेटीमागून अलगदपणे काढलेल्या या नागाला मोठय़ा चपळाईने कुमावत यांनी पकडले. परिसरातील नागरिकांनी श्वास रोखून हा थरार पाहिला.